नाशिक / अस्वली स्टेशन : रात्री दहाच्या सुमारास भाऊसाहेब यांचे चुलत्याबरोबर जमिनीच्या कारणावरूनच कोयते-कुऱ्हाड घेऊन जोरदार भांडण झाले. शेजाऱ्यांनी भांडण सोडवून प्रकरण मिटविलेही..पण सकाळी उठून शेतकऱ्याच्या पत्नीने घडलेला प्रकार पाहून धक्का बसला...केवळ आक्रोशच आक्रोश..
ही गोष्ट भाऊसाहेबांच्या मनात काट्याप्रमाणे सलत होती
भाऊसाहेब फोकणे व त्यांचे चुलते परशराम फोकणे यांचे अनेक दिवसांपासून शेतात जाण्या-येण्याच्या रस्त्यावरून वाद सुरू होते. बुधवारी (ता. ८) रात्री दहाच्या सुमारास भाऊसाहेब यांचे चुलत्याबरोबर जमिनीच्या कारणावरूनच कोयते-कुऱ्हाड घेऊन जोरदार भांडण झाले. शेजाऱ्यांनी भांडण सोडवून प्रकरण मिटविले. ही गोष्ट भाऊसाहेबांच्या मनात काट्याप्रमाणे सलत होती. मानसिक तणावातून त्यांनी मध्यरात्री गळफास घेतला. सकाळी पत्नीने आक्रोश करीत परशराम फोकणे हेच पतीच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत, अशी घोटी खुर्दच्या पोलिसांकडे फिर्याद दिली. आरोपी परशुराम फोकणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती..
पोलिसांत गुन्हा दाखल
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील घोटी खुर्द येथील शेतकरी भाऊसाहेब फोकणे (वय ३५) यांनी जमिनीच्या वादातून आत्महत्या केली. पत्नीच्या फिर्यादीवरून वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.