नाशिक

बनावट कागदपत्रांच्या अधारे कोट्यावधीची जमीन लाटली.

CD
दोन कॉलम बातमी ---- बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटली कोट्यवधीची जमीन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : मेहरुण परिसरातील जमिनीसंदर्भात बनावट कागदपत्रे व खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महसुली जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुमनबाई रघुनाथ पाटील (वय ७६, रा. नामदेवनगर, इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ फेब्रुवारी ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत व्यंकटेश कॉलनी, मेहरुण, जळगाव येथील (सर्व्हे नं.४७२/१/पै/प्लॉट क्र.०२) मधील (४८३.०९ चौरस मीटर) जागा बळकावण्यासाठी संशयितांनी कटकारस्थान रचून संशयित वनिता कैलास पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) आणि ममता प्रदीप पाटील (वय ३४, रा.बऱ्हाणपूर रोड, रावेर) यांनी इतर साथीदारांच्या मदतीने नमूद जमिनीचे बनावट व खोटे कागदपत्र तयार केले. खोटे दस्तऐवज खरे असेल्याचे भासवून संशयितांनी फिर्यादीसह शासनाची दिशाभूल व फसवणूक करून ही जागा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नावावर करून घेतल्याप्रकरणी तक्रार दिल्यावरुन वनिता कैलास पाटील, ममता प्रदीप पाटील व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक अशोक काळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT