नाशिक

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... दोस्ताला चंद्रावर केली जमीन 'गिफ्ट'

सकाळ डिजिटल टीम

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हटलं जातं. दोस्तीचं नातं कायम सगळ्यांना हवं हवंसं वाटत असतं. मित्र एकमेकांच्या सुख दु:खात कायम वाटेकरी असतात. गरज असेल किंवा मदतीचा हात पुढे करायचा असेल, शेवटी मित्रच आधार असतात. त्यासाठी रक्ताच्या नात्यांची आवश्यकता नसते. नाशिकमध्ये एकाने दोस्ताला थेट चंद्रावर जमीन गिफ्ट केली आहे. (Land Gifted on moon)

इगतपुरीच्या गोंदेमधील या मित्रांचा किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एमबीबीसचा विद्यार्थी असणाऱ्या रुपेश नाठे याला त्याच्या डॉक्टर मित्राने चंद्रावर 1 एकराचा प्लॉट दिलाय. रुपेशचा वाढदिवस असल्याने त्याला डॉ. हृषीकेश मुधळे आणि कुटुंबीयांनी हे गिफ्ट दिलंय. आंतरराष्ट्रीय लुनार लॅन्ड्स ऑथोरिटी (ILLA) या संस्थेकडे यासंबंधी अधिकृत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जागेची नोंदणी झाल्यानंतर त्याचा अधिकृत नकाशाही दोघांना देण्यात आला आहे.

याआधी सुशांतसिंह राजपूतलाही अशाच प्रकारे चंद्रावर जमीन गिफ्ट करण्यात आली होती. सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर त्याच्या उरलेल्या वस्तूंमध्ये ही बाब समोर आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT