MLA Suhas Kande Sakal
नाशिक

नांदगावचे भूमिअभिलेख कार्यालय जाणार नव्या संकुलात

संजिव निकम

नांदगाव (जि.नाशिक) : येथील वादग्रस्त ठरलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराने कळस गाठल्याचा परिणाम आमदार सुहास कांदे (MLA Shas Kande) यांच्यासह शिवसैनिक मंगळवारी (ता. २९) रस्त्यावर उतरल्याने पोलिस, महसूल विभागासह तालुकास्तरीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने येथील जुन्या तहसील कार्यालयाला त्यामुळे पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (land records office of Nandgaon will be shifted to the new complex)


दलालांच्या विळख्यात सापडलेल्या भूमिअभलेख विभागाविरोधात तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून रस्त्यावर उतरत आमदार सुहास कांदे यांनी थेट आत्मदहनाचे अस्त्र बाहेर काढल्याने नाशिकहून विभागाचे जिल्हा अधीक्षक महेश शिंदे स्वतः घटनास्थळी सकाळीच दाखल झाले. आमदार कांदे यांच्या संभाव्य कृतीकडे यंत्रणेसह सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक दिसून येत होत्या. दरम्यान, आमदार कांदे यांचे जुन्या तहसीलमध्ये आगमन होताच मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग त्यांना सामोरे गेले व आंदोलन करण्याची पार्श्‍वभूमी समजावून घेत चर्चेचा प्रस्ताव ठेवला. तो स्वीकारून आमदार कांदे यांचे नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलास आहेर आदी मोजके पदाधिकारी विलास दाणी यांच्या दालनात पोहचले. विभागाचे जिल्हा अधीक्षक महेश शिंदे यांनी चर्चेला सुरुवात करताना आमदार कांदे व शिवसैनिकांनी आपले आंदोलन मागे घ्यावे व एकूणच नांदगाव तालुक्यातील आपल्या विभागातील कामकाजाच्या अनुषंगाने उद्‌भवलेल्या कार्यालयीन त्रुटी, दप्तर दिरंगाई, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आदी मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी आपल्याला एक महिन्याचा अवधी द्यावा, अशी विनंती त्यांनी आमदार कांदे यांना केली.

या चर्चेदरम्यान आमदार कांदे यांनी संबंधित कार्यालयात खातेप्रमुख व अन्य कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा कसा वाढलाय याचे प्रात्यक्षिकच जिल्हा अधीक्षकांना दाखवून दिले. वादग्रस्त ठरलेल्या काही कर्मचाऱ्यांना जिल्हा अधीक्षकांच्या पुढ्यात उभे करण्यात आले तेव्हा या कर्मचाऱ्यांची आपल्या बचावासाठी उत्तरे देताना मोठी त्रेधातिरपीट उडाली. वादग्रस्त ठरणाऱ्यांकडून पदभार दुसऱ्याकडे हस्तांतरित करावा व दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी सूचना आमदार कांदे यांनी चर्चेदरम्यान जिल्हा अधीक्षक शिंदे यांना केल्यावर ती मान्य करीत सध्या जुन्या तहसील आवारात असलेले भूमिअभिलेख विभागाचे कार्यालय नव्या प्रशासकीय संकुलात स्थलांतरित करण्याबाबत महिनाभरात कारवाई करू, असे आश्‍वासन दिले.


या वेळी माजी सभापती विलास आहेर, चंद्रशेखर कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख सुनील जाधव, नूतन कासलीवाल, सागर हिरे, महिला आघाडीच्या पदाधिकारी संगीता बागुल, लिलाबाई राऊत, कल्पना दोंदे उपस्थित होत्या.


जिल्हा अधीक्षक झाले निरूत्तर…

जनतेच्या प्रश्‍नावर कामचुकारपणा करणाऱ्यांना झाडाला उलटे लटकवू, असा इशारा दिल्यावर अनेक कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. भूमी अभिलेखच्या वादग्रस्त कामकाजामुळे स्थानिक पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात भांडणे दाखल होत असल्याच्या प्रकाराकडे पोलिस निरीक्षक अनिल कातकाडे यांनी जिल्हा अधीक्षक महेश शिंदे यांचे लक्ष वेधल्यावर भूमिअभिलेख विभागाला नांदगावमधील खुनखराबे वाढवायचे आहेत का, असा संतप्त सवाल आमदार कांदे यांनी करताच जिल्हा अधीक्षकांना निरुत्तर व्हावे लागले.

(land records office of Nandgaon will be shifted to the new complex)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT