Bribe Crime
Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: भूमी अभिलेखचा दप्तरबंद लाचलूचपतच्या जाळ्यात! 700 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

अजित देसाई

सिन्नर : गट स्कीम उतारा, गट नकाशा व पोटहिस्सा नकाशा नकला काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरबंद सूर्यभान मुरलीधर निंबाळकर ( वय 58) यास सातशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. (Land records officer Caught red handed by ACB while accepting bribe of Rs 700 at sinnar Nashik Bribe Crime)

मंगळवारी सायंकाळी सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने 25 जानेवारी रोजी सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयात गट स्कीम उतारा गट नकाशा व पोट हिस्सा नकाशाची नक्कल मिळावी म्हणून अर्ज केला होता.

सदर नकला देण्याच्या बदल्यात कार्यालयातील दप्तरबंद सूर्यभान निंबाळकर याने 700 रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून निंबाळकर यास तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना सरकारी पंचांच्या समक्ष रंगेहात पकडण्यात आले. हवालदार शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी कारवाईत सहभागी झाले होते.

काही महिन्यांपूर्वी देखिल सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याची ओरड आहे.

भूमी अभिलेख कार्यालयात अपुरे मनुष्यबळ असल्याने नागरिकांना वेळेत कागदपत्रे उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनावश्यक लाच देण्याची वेळ येते. कर्मचारी देखील या परिस्थितीचा लाभ उचलत नागरिकांची अडवणूक करतात अशी चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT