molestation.jpg 
नाशिक

डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (लासलगाव) 'तुझा नवरा घरी नाही, गावाला गेलाय म्हणून काय झाले, तुझा नवरा नसला तरी मी आहे ना'...अन् त्या डॉक्टरने केले असे धक्कादायक कृत्य...गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली घटना... 

अशी आहे घटना

गुरुवारी (ता. 25) दुपारी तीनच्या सुमारास डॉ. मोहम्मद नासिर मोहम्मद उस्मान यांच्या आयशा आयुर्वेदिक युनानी दवाखान्यामध्ये पीडित महिलेची तब्बेत बरी नसल्याने उपचारासाठी तिच्या मुलासोबत ती आली असता संशयित डॉक्‍टरने हात पकडत अश्‍लील भाषेत संवाद साधून तिचा विनयभंग केला. 'तुझा नवरा घरी नाही, गावाला गेला आहे. म्हणून काय झाले तुझा नवरा नसला तरी मी आहे ना' असे अश्लिल भाषेत बोलल्याने फिर्यादीच्या मनाला धक्का बसला असून लज्जा उत्पन्न झाली. म्हणून फिर्यादीने लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित महिलेला संबंधीत प्रकाराचा मोठा धक्का पोहचला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात भादवि 354, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय यु बी मोहरे, आर पी जोपळे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested : 'कॅप्टन' खरातचा घाणेरडा चेहरा उघड; महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती, राजकीय वर्तुळात खळबळ

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT