नाशिक

लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीतून 25 दिवसांत कोटींची उलाढाल

अरूण खंगाळ,लासलगाव

लासलगाव (जि.नाशिक) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (coronavirus) विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते २३ मे २०२१ अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडॉउनची (lockdown)अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांमधील शेतमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. नाशिक जिल्ह्यातील (nashik market committee) बाजार समित्यांमधील लिलावाचे कामकाज २४ मेपासून सुरू झाल्यानंतर २५ दिवसांत लासलगाव बाजार समितीत विक्रमी ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. (Lasalgaon-Market-Committee-turnover-25 days-from-onion-sales-nashik-marathi-news)

कांदा विक्रीतून 25 दिवसांत कोट्यावधींची उलाढाल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते २३ मे २०२१ अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडॉउनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांमधील शेतमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर २४ मेपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. २४ मे ते २० जून या कालावधीत लासलगाव बाजार समितीच्या लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारावर ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. कांदा विक्रीतून १७१ कोटी ४७ लाख ११ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली. १७१ कोटी ४७ लाख ११ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

सरासरी बाजारभावातही ७०० रुपयांनी वाढ

गेल्या वर्षी याच कालावधीत सहा लाख २५ हजार ७४७ क्विंटल कांद्याची आवक होऊन ५० कोटी १८ लाख ४९ हजार ९४ रुपयांची उलाढाल झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच लाख १७ लाख ३९४ क्विंटल कांद्याची जादा आवक झाली असून, त्यातून १२१ कोटी २८ लाख ६२ हजार ४०६ इतक्या रकमेची जादा उलाढाल झाली आहे. शिवाय सरासरी बाजारभावातही ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सद्यःस्थितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव स्थिर असून, शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा योग्य प्रतवारी करून बाजार आवारावर विक्रीस आणावा. जेणेकरून चांगला दर मिळेल. - सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT