onion esakal
नाशिक

लासलगावचा कांदा व्हाया कसबे-सुकेणे बांगलादेशाला रवाना

भारत मोगल

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : भारतातील सर्वात मोठे कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांचा कांदा कसबे सुकेणे रेल्वे स्टेशन वरून बांगलादेश व भारतातील इतर अंतर्गत मोठ्या बाजारपेठांसाठी रवाना झाला आहे.

(Lasalgaon onion export to Bangladesh)

परदेशामध्ये भारतीय कांद्याला मोठी मागणी

कसबे सुकेणे येथील रेल्वे स्टेशन वरून हा सर्व कांदा बोगीमध्ये भरून रवाना झाला यासाठी नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या कांदा व्यापाऱ्यांचा माल या ठिकाणी जमा झाला. सध्या कांदा पिकाला चांगला भाव मिळत असून चांगला कांदा सरासरी १८०० ते २१०० रुपये पर्यंत विकला जात आहे देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशामध्ये देखील भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळेच हा कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे चालू वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या दोन वर्षापासून पावसाने शेतकऱ्यांना तारल्यामुळे भूजल साठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी हक्काचे व्यापारी पीक म्हणून कांदा या पिकाकडे बघू लागला. शिवाय कांदा उत्पादनास नाशिक जिल्ह्यातील हवामान पोषक असल्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे.

शेतकऱ्यांना आता खरीप पिकाचे वेध

मागील वर्षी देखील कांद्याला चांगला भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पर्यायाने यावर्षी देखील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली यामुळे देखील कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली असून कांदा चाळी व्यतिरिक्त उरलेला कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे, तर काही शेतकऱ्यांना आता खरीप पिकाचे वेध लागले आहे. अशावेळी शेतीची मशागत, बी बियाणे व खतांची खरेदी, पेरणी यासाठी भांडवलाची आवश्यकता असते यामुळे देखील अनेक शेतकरी आपला कांदा बाजारपेठेत विकत आहे. परीणामी कांदा मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून या कांद्याला मोठी मागणी ही असल्याने कांद्याची निर्यात होत आहे. त्याचाच परिणाम कसबे सुकेणे येथील रेल्वे स्टेशन वरून हा सर्व कांदा बांगलादेश व इतर बाजारपेठांत साठी रवाना झाला.

Lasalgaon onion export to Bangladesh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT