Tributes were paid by dignitaries at the funeral meeting organized by Gokhale Education Society esakal
नाशिक

Nashik News: दिवंगत डॉ. गोसावी यांच्‍या विचारांना पुढे न्‍यावे; शोकसभेत मान्यवरांनी वाहिली आदरांजली

गोखले एज्‍युकेशन सोसायटी आयोजित शोकसभेत मान्यवरांनी वाहिली आदरांजली

सकाळ वृत्तसेवा

: दिवंगत डॉ. मो. स. गोसावी यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी वेचले. संस्‍थेचा नावलौकिक वाढविताना संस्‍कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य ते करीत राहिले.

त्‍यांनी दिलेले विचार पुढे नेताना आदर्श समाज घडविण्यासाठी प्रयत्‍नशील राहणे, हीच त्‍यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना मंगळवारी (ता. ११) व्‍यक्‍त करण्यात आल्या. (Late Dr MS Gosavi ideas should be carried forward Tributes paid by dignitaries in funeral Nashik News)

गोखले एज्‍युकेशन सोसायटीतर्फे संस्‍थेच्‍या कॉलेज रोडवरील शैक्षणिक संकुलातील गुरुदक्षिता सभागृहात संस्‍थेचे सचिव तथा महासंचालक दिवंगत डॉ. मो. स. गोसावी यांच्‍या शोकसभेचे आयोजन केले होते. या वेळी उपस्‍थित राहून मान्‍यवरांनी आठवणींना उजाळा दिला.

पालकमंत्री दादा भुसे म्‍हणाले, की आजच्‍या पिढीचे शिक्षणमहर्षी असलेल्या डॉ. गोसावी यांच्‍याकडे दूरदृष्टी होती.

पालकमंत्रिपदाची जबाबदारी आल्‍यावर शिक्षण संस्‍थाचालकांच्‍या बैठकीत त्‍यांनी नाशिक एज्‍युकेशन हब होण्यासाठी मोलाच्या सूचना केल्‍या. त्‍यांचे कार्य कधीही विसरता न येण्यासारखे आहे.

आमदार सीमा हिरे म्‍हणाल्‍या, की नेतृत्‍व, दातृत्व व कर्तृत्व काय असते, याचे मूर्तिमंत उदाहरण डॉ. गोसावी होते. विद्यार्थिदशेपासून नेहमीच त्‍यांचे मार्गदर्शन मिळाले.

आमदार प्रा. देवयानी फरांदे म्‍हणाल्‍या, की डॉ. गोसावी यांनी संस्‍था आणि संस्‍थेच्‍या विकासासाठी काम केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्‍यांचे काम पुढे नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी लागेल. संस्‍थेच्‍या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे म्‍हणाल्‍या, की सरांच्‍या नेतृत्‍वाखाली संस्‍थेने वैद्यकीय शिक्षणात दमदार पाऊल टाकले. त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण करणे, हीच त्‍यांना श्रद्धांजली ठरणार आहे.

शोकसभेच्‍या सुरुवातीस संस्‍थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी डॉ. मो. स. गोसावी यांच्‍या कार्याचा आढावा घेतला. यानंतर विनोद देशपांडे यांनी डॉ. गोसावी यांच्‍या शालेय शिक्षणातील योगदान सांगितले.

‘बीवायके’चे प्राचार्य व्‍ही. एन. सूर्यवंशी यांनी आठवणींना उजाळा दिला. गिरीश नातू यांनीही आठवणी सांगितल्‍या. देणगीदारांतर्फे अतुल चांडक यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. तसेच, माजी प्राचार्य के. पी. शिंपी, ॲड. जयंत जायभावे, लक्ष्मीकांत जोशी, संस्‍थेच्‍या उपाध्यक्षा सुहासिनी संत, आर. पी. देशपांडे, शिक्षण मंडळाचे सचिव मच्‍छिंद्र कदम आदींनी मनोगत व्‍यक्‍त केले.

डॉ. गोसावींचे कार्य दीपस्‍तंभाप्रमाणे : डॉ. सोनवणे

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे म्‍हणाले, की कौन्‍सिल ऑफ टीचर्स एज्‍युकेशन याकरिता काम करताना डॉ. गोसावी यांच्‍याशी संपर्क आला.

शिक्षण विषयाची दिव्‍यदृष्टी असल्‍याचा अनुभव त्‍यांच्‍या भेटीत आला. त्‍यांचे कार्य दीपस्‍तंभाप्रमाणे असल्‍याचे त्‍यांनी मनोगतात नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT