नाशिक

एन.टी.व्ही.एस. फार्मसीच्या विद्यार्थ्याची आविष्कार स्पर्धेत दमदार कामगिरी

CD
फोटो : 35332 नंदुरबार : लतेश मकवाना यांचा सत्कार करताना प्राचार्या प्रा. वैशाली डी. शेवाळे, प्रा. तेजल पवार, प्रा. किशोर राठी. -------------- लतेश मकवाना यांची राज्य स्पर्धेसाठी निवड नंदुरबार, ता. १८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत नंदुरबार तालुका विधायक समितीच्या एनटीव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा पदवीपूर्व विद्यार्थी लतेश मकवाना यांनी उल्लेखनीय यश मिळवले. मानवविद्या, भाषा व ललित कला या विभागात तो द्वितीय आला. या यशामुळे त्यांची राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली. लतेश यांनी ‘बोलकी भिंत’ या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पारंपरिक भित्तिचित्रांचे दस्तऐवजीकरण, स्थानिक कला व संस्कृतीचे जतन तसेच सांस्कृतिक वारशाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या संकल्पनेला विद्यापीठस्तरावर विशेष दाद मिळाली. यासाठी त्यांना प्रा. तेजल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. किशोर राठी यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सचिव बी. के. पाटील, संस्थेचे समन्वयक डॉ. एम . एस. रघुवंशी आणि प्रा. वैशाली शेवाळे यांनी लतेशचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

Nagpur News : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कान्होलीबारातील शिक्षकाला अटक; सायबर पोलिसांची कारवाई, तीन दिवसाची पोलिस कोठडी

Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

Latest Marathi News Live Update : उसाच्या पहिल्या उचलीसाठी सोलापुरात 'स्वाभिमानी' आक्रमक; माढ्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे गाळप पाडले बंद

MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

SCROLL FOR NEXT