The work in progress of the jogging track in Shani Mandir to Bazar Patangan area in the first phase and the concept of the jogging track in the second photo. esakal
नाशिक

Nashik News: कळवणला साकारतोय अद्ययावत जॉगिंग ट्रॅक! 22 कोटी रुपये मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी म्हणून लवकरच शहरात अद्ययावत असा जॉगिंग ट्रॅक तयार केला जात असून सद्य:स्थितीत पहिल्या टप्प्यातील ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे कळवण शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. (latest jogging track building started at kalavan 22 crore approved Nashik New)

शहराच्या विकासासाठी आमदार नितीन पवार व नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली विविध कामे मार्गी लागत असून नवनवीन नागरी सुविधांची निर्मिती केली जात आहे.

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शनिमंदिर ते संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत अद्ययावत असा जॉगिंग ट्रॅक उभारणार जात आहे.

नावीन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत आमदार नितीन पवार यांच्या विशेष पाठपुराव्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी या प्रकल्पासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती.

या प्रकल्पासाठी शासनाकडून २२ कोटी रुपये मंजूर झाले. पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून शनी मंदिर ते बाजार पटांगण (एकलहरे रास्ता) यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे

जॉगिंग ट्रॅकची वैशिष्टे

- अंतर-बेहडी नदीवरील ( संभाजी नगर पूल) ते थेट गिरणा संगम

- आकर्षक प्रवेश द्वार

- अंदाजे १ हजार ४००मीटर लांबी

- ट्रॅकची ब्रिकबॅटमध्ये बनणार ट्रॅक

- प्रस्तावीत लांबीत तीन आकर्षक पुलांचा समावेश

- नदीच्या प्रवाहाने जमिनीची झीज होऊ नये यासाठी सिमेंट काँक्रिटची तटबंदी

- बाराही महिने नदीच्या प्रवाहात स्थिर पाणी राहील यासाठी बंधारे

- नदीलगतच्या बाजूस बसण्यासाठी बाकांची सोय

- संपुर्ण ट्रॅकला झाडांची लागवड

- वातावरणात निर्मितीसाठी वॅाटरप्रुफ म्युझिक सिस्टम

- सतीमाता मंदिर व संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात योगासाठी चबुतरा

- सुलभ शौचालयांची सोय

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"कळवणकरांनी नगरपंचायतीमध्ये सत्ता दिली. शहरातील विविध विकास कामांसाठी व अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून जॉगिंग ट्रॅक सारखे नावीन्यपूर्ण प्रकल्प आगामी काळात करण्यासाठी कटिबद्ध आहोत." - नितीन पवार, आमदार

"आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट करून जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात विकासकामांच्या बाबतीत कळवण नगरपंचायत रोलमॉडेल ठरेल यासाठी प्रयत्नशील आहे." - कौतिक पगार,नगराध्यक्ष

"कळवण शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या विकासाप्रती असलेल्या अपेक्षा यातून कळवण शहरात विविध शहरी सुविधा निर्माण होत असून येत्या काळात आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहराचे रूप अधिक आकर्षक आणि विकासाभिमुख असेल."

-भूषण पगार, युवा नेते

शहराच्या वैभवात भर व नागरिकांच्या आरोग्यासाठी जॉगिंग ट्रॅकसाठी २२ कोटी रुपयांची योजना असून पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे."- अविनाश गांगोड, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT