Adv. Nitin Thackeray
Adv. Nitin Thackeray esakal
नाशिक

समाजमन : राष्ट्रवाद अन् राष्ट्रप्रेमाबद्दल नागरिक अधिक जागरूक

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

विशाल मानवतेच्या दृष्टीने विचार करता आपल्या राष्ट्राबद्दल निष्ठा बाळगणे हे महत्त्वाचे. विकसनशील देशांच्या, नवस्वतंत्र देशांच्या दृष्टीने तर याचे महत्त्व विशेष आहे. म्हणूनच आपलाही प्रयत्न व्हायला हवा, त्यासाठी भगीरथ प्रयत्नांची गरज आहे.

अलीकडच्या काळात विशेष करून दहा-बारा वर्षांत राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेम याबद्दल नागरिक अधिक पद्धतीने जागरूक झालेले आपणास पाहावयास मिळत आहेत. आपल्या मातृभूमीबद्दल असलेले निस्सीम प्रेम म्हणजे जाज्वल्य देशभक्ती होय. (latest marathi article by adv nitin thackeray on Citizens more aware about nationalism and patriotism nashik news)

राष्ट्रप्रेम प्रत्येकात असतेच, व्यक्त करण्याची पद्धत कदाचित प्रत्येकाची वेगवेगळे असू शकते. त्याबद्दल मतमतांतरेही असतील. पूर्वीच्या काळी राष्ट्रप्रेम म्हणजे फक्त सीमेवर लढणारा सैनिक अशीच व्याख्या काही घटकांमध्ये असायची.

मात्र, राष्ट्रप्रेम म्हणजे फक्त तेवढेच नव्हे. देशाबद्दलचा सन्मान, अभिमान व प्रेम हे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या अंतर्मनातून व्यक्त होतच असते. त्यासाठी राष्ट्राने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण राष्ट्राला काय देतो हे महत्त्वाचे आहे.

अलीकडच्या काळात विशेष करून दहा-बारा वर्षांत राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेम याबद्दल नागरिक अधिक पद्धतीने जागरूक झालेले आपणास पाहावयास मिळत आहेत. आपल्या मातृभूमीबद्दल असलेले निस्सीम प्रेम म्हणजे जाज्वल्य देशभक्ती होय.

राष्ट्रवाद म्हणजे एक ध्रुवीकरण, ज्याचा केंद्रबिंदू हे राष्ट्र असते. बाकी सर्व मुद्दे गौण ठरवून राष्ट्राच्या अस्तित्वासाठी, संरक्षणासाठी आणि विकासासाठी ज्या भावनेच्या भोवती केंद्रीकरण केले जाते, तो राष्ट्रवादाचा केंद्रबिंदू ठरतो.

जेव्हा त्याला लोकभावनेची जोड मिळते किंवा दिली जाते, तेव्हा तो एक भावनिक मुद्दा होतो, म्हणजे त्याची पूर्तता झाल्यावर आर्थिकदृष्ट्या देशात फार सकारात्मक घडते असेही नाही; पण त्याचे अस्तित्वही नाकारता येत नाही.

राष्ट्रप्रेमाची भावना

‘राष्ट्रवाद’ या संकल्पनेचा सरळ साधा अर्थ राष्ट्रप्रेमाची भावना असा होतो. राष्ट्रवाद म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी, राष्ट्र म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. राष्ट्रासाठी इंग्रजी भाषेत ‘नेशन’ पर्यायी शब्द वापरला जातो.

नेशन या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन नेटियो शब्दापासून झाली आहे. ज्याचा अर्थ ‘जन्म’ किंवा ‘वंश’ असा होतो. व्यक्तीला जन्मतः मिळालेला धर्म, वंश, भाषा, संस्कृती, परंपरा यामुळे एखाद्या लोकसमूहामध्ये निर्माण झालेली एकत्वाची भावना हा राष्ट्रप्रेमाचा म्हणजेच राष्ट्रवादाचा आरंभबिंदू असतो.

राष्ट्रवाद नागरिकांमध्ये बंधुभाव, निष्ठा, त्यागाची भावना, राष्ट्रहिताला अग्रक्रम अशा बाबींची रुजवणूक करीत असतो. एका उन्नत समाजजीवनाकडे, आर्थिक प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य राष्ट्रवादात आहे. साम्राज्यवादाला, वसाहतवादाला आव्हान देण्याचे महत्त्वाचे कार्य राष्ट्रवादाने केले आहे.

इतिहासात आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. कुठलीही साधनसामग्री नसतानाही, कमी मनुष्यबळाच्या आधारावर फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर व देशभक्तीच्या प्रेमातून अनेक मोठमोठी साम्राज्ये सर्वसामान्यांनी उलथून लावली आहेत. त्यामागचे मूळ कारण म्हणजे तुम्हाबद्दल असलेले नितांत प्रेम व त्यासाठी समर्पित भावना होय.

राष्ट्रवादाचे महत्त्व

कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी, राष्ट्राच्या नागरिकांना राष्ट्रवादाची भावना असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादाचे महत्त्व समजून घेणे व आपल्या नागरिकांमधील देशभक्तीची पुनरावृत्ती करणे, सर्व सरकार संपूर्ण जगभर राष्ट्रीय उत्सव आयोजित करेल.

या कार्यक्रमांदरम्यान राष्ट्रीय ध्वजांबद्दल आदर व्यक्त केला जातो. तो धर्म, जात आणि अस्थिरता या अडथळ्यांना काढून टाकतो.

मूळ समस्येवर लढा म्हणजे राष्ट्रवाद

राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेमाबद्दल भारतातील सर्व जनतेत कोठेच असहमती असूच शकत नाही; परंतु राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय आणि तो कृतीत कसा आणावा हे मूळ प्रश्न आहेत.

ज्या उद्देशासाठी अनेक वर्षे स्वातंत्र्यसंग्राम चालविला, तो उद्देश सफल झाला का? स्वातंत्र्यप्राप्तीच्या इतक्या वर्षांनंतरही हे राष्ट्र त्यांच्या स्वप्नातील सुखी आणि समृद्ध देश झाला का? आम्ही ब्रिटिशांना परतवून लावले;

परंतु आमचे मूळ शत्रू देशविघातक शक्ती, गरिबी, अन्याय, असमानता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कुपोषण आदींना या ७५ वर्षांत आपण पराजित करू शकलो का? मुळात ज्या उद्देशासाठी स्वातंत्र्य मिळविण्यात आले, तोच जर पूर्ण झाला नसेल तर हा कसला राष्ट्रवाद? खरे तर देशातील जनसामान्यांच्या मूळ समस्येवर सर्वांना बरोबर घेऊन लढा देणे हा राष्ट्रवाद आहे. राष्ट्रवादाच्या या व्याख्येबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.

आधुनिक राष्ट्रवाद

जीवनात जसा आईला दर्जा आहे, तसाच राष्ट्रालाही आहे. संपूर्ण जगात तसेच आहे. एक आई आपल्या मुलास जन्म देते, त्याचप्रमाणे एक राष्ट्र आपल्या नैसर्गिक संसाधनांद्वारे आपल्या नागरिकांच्या विविध गरजा पूर्ण करते.

देशभक्ती ही भावना अगदी पूर्वीपासून आहे. आपण ज्या परिसरात राहतो, तो परिसर आणि तिथल्या लोकांविषयी वाटणारी आपुलकी यातून ती तयार होते; परंतु ही भावना राष्ट्रीयतेशी जोडली गेली, तेव्हा आधुनिक राष्ट्रवाद जन्माला आला.

आपल्या इतर सर्व निष्ठांपेक्षा राष्ट्राविषयीची निष्ठा प्रबळ असणे किंवा ठरणे म्हणजे हा आधुनिक राष्ट्रवाद. ही प्रक्रिया ज्या देशांमध्ये खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेली, त्या देशांनी प्रगती साधली, असेही आपल्याला दिसते आणि त्यामुळेच आपल्या देशालाही अशा प्रकारच्या प्रगतीचा लाभ व्हावा, अशी इच्छा तीव्रतेने वाटणारे विचार शासनदरबारी पोहोचविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

आधुनिक किंवा आताच्या पिढीची राष्ट्रीय भावना किंवा देशभक्ती ती हीच. राष्ट्रवाद ‘आपले’ आणि ‘परके’ यात भेद करतो, हे खरेच आणि विशाल मानवतेच्या दृष्टीने विचार करता या भावनेला संकुचित ठरविताही येईल.

आपल्या राष्ट्राबद्दल निष्ठा बाळगणे हे महत्त्वाचे. विकसनशील देशांच्या, नवस्वतंत्र देशांच्या दृष्टीने तर याचे महत्त्व विशेष आहे. म्हणजेच प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी भगीरथ प्रयत्नांची गरज आहे.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT