The poster of the rap song 'Aaplach Chala Nahit' produced by Three Person Productions.
The poster of the rap song 'Aaplach Chala Nahit' produced by Three Person Productions. esakal
नाशिक

Latest Marathi Rap Song: रॅप सॉंग 'आपलाच चांगला नहीत' चा धुमाकूळ! सध्याच्या परिस्थितीवर मार्मिक भाव

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर : रॅप सॉंग म्हटलं की तरुणाई बेधुंद होऊन जाते. वेगवेगळ्या धाटणीच्या या गीतांना रसिक डोक्यावर घेतात.

सध्याच्या परिस्थितीत व्यंगात्मक मार्मिक भाव व्यक्त करणारे नवं कोर " आपलाच चांगला नहीत" हे अहिराणी भाषेतील रॅप गीत यु-ट्यूबच्या माध्यमांतून सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. (Latest Marathi Rap Song rap song Aaplach Challan Nahit in full swing poignant take on current situation nashik)

मालेगाव म्हटले की मॉलीवूड. या मॉलीवूडची एक वेगळीच ओळख राज्यासह संपूर्ण देशभरात झालेली आहे. यावेळी मालेगावचे भूमीपुत्र दिगदर्शक तुषार शिल्लक यांच्या तीन व्यक्ती प्रॉडक्शन निर्मित नव्या रॅप सॉंग ची सध्या जोरदार चर्चा आहे.

श्री. शिल्लक यांनी सध्या असलेल्या वास्तव परिस्थितीवर भाष्य करत शेतकऱ्यांच्या जीवनाचं चित्रण रेखाटन करताना गावगाडा, नातेगोते, गावगाडा ते ग्रामपंचायत अशा विषयांचे विनोदी भाव रॅप गीतामध्ये आणले आहे. संगीत भुषण घोडके तर बागलाण रॅप फेम महेश पाटोळे यांनी गायन केले आहे.

खान्देश व कसमादे भागातील वेगवेगळ्या अहिराणी लहेजा मधील आलेल्या अनेक अहिराणी गाण्यांची लोकप्रियता लाखोंच्या संख्येने व्ह्युव्हज देत महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश या सीमाभागासह पुणे मुंबईच्या रसिकांना ताल धरायला लावला आहे.

यापुर्वी अहिराणीतून 'आग्या हो विसरग्या हो', 'देव मना मामलेदार','तुना प्यार मा','निघनू माय मी जतराले' यांचेसह रॅप सॉंग ' मालेगाव रॅप -१', 'मालेगाव रॅप -२' व 'बागलाण रॅप ' च्या दमदार यशानंतर 'आपलाच चांगला नहीत ' हे नव्या पिढीसह वास्तवाची धग अनुभवलेल्या जुन्या जाणत्यांसह रसिक लोकप्रिय करतील असे यात शंका नाही.

"रॅप सॉंग माध्यमातून सर्व क्षेत्रातील आपल्याच माणसांकडून कसा त्रास होतो. अशा त्या त्या व्यक्तीच्या भावना मांडल्या आहेत. अहिराणी भाषेतील रॅप लिहून तुषार शिल्लक यांनी या वैभवात आणखीनच भर घातली आहे."- प्रा. अंकुश मायाचार्य, कला, साहित्य रसिक

"'आपलाच चांगला नहीत’ हे अहिराणी रॅप सॉंग सर्वांच्या तन मनात धुमाकूळ घालत आहे. खूप छान प्रयोग आहे. अहिराणी संवर्धनासाठी योग्य व दिशादर्शक वाटचाल आहे."

- डॉ.एस.के.पाटील. दुसरे विश्व अहिराणी साहित्य संमेलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT