Mohammed Shahid doing make-up to play Nashik Joker esakal
नाशिक

Asian Circus : संघर्षाच्या जीवनातून हसवणारा जोकर! महम्मद शाहीद एशियन सर्कशीतून करतोय प्रेक्षकांचे मनोरंजन

संघर्षाचे जीवन..तरीही सर्वांना हसवतो जोकर..!

अरुण मलाणी

नाशिक : सध्याच्‍या धकाधकीच्‍या व तणावपूर्ण जगण्यात चेहऱ्यावरच हसूच जणू हरवले आहे. त्‍यामुळे हसण्यासाठी टीव्‍हीवरील मालिका पाहाव्‍या लागतात.

पण जगण्याचे सारे दुःख आणि संघर्ष विसरत स्वतःच्या चेहऱ्यावर हसू ठेवताना, आलेल्‍या प्रेक्षकांना लोटपोट हसविणारा महम्मद शाहीद याला जगण्याचा खरा अर्थ समजलाय. एशियन सर्कशीतील हा ‘जोकर’ गेल्‍या अठरा वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. (laughing clown from life of struggle Mohammad Shahid entertains audience with his Asian circus tour nashik news)

मुळचा बिहार येथील महम्मद शाहीद याचे वडीलदेखील सर्कशीत जोकर होते. शिक्षणात फारसे मन लागले नाही. उंची खूप कमी होती म्‍हणून मनात काहीशी भीती होती. अशात शाळा सुटली अन् रोजीरोटीसाठी वडीलांप्रमाणे महम्मद हादेखील सर्कशीत जोकर म्‍हणून काम करू लागला.

मग काय सर्कस जिथे जाईल, तिथे जायचं, तिथेच राहायचं. मिळणाऱ्या मानधनातून काही पैसे घरी आई- बहिणीला पाठवायचे अन् काही स्‍वतःच्‍या खर्चासाठी साठवायचे. अशी त्‍याची दैनंदिनी बनली आहे. सर्कशीत सध्या प्राण्यांवर तर बंदी आहे.

त्यामुळे दोन- तीन तासांच्‍या या खेळात थरारक कसरतीचे आकर्षण प्रेक्षकांना असते. सोबत महम्मद आपल्‍या जोकर मित्रांसोबत उपस्‍थितांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी स्वतःचा विनोद बनवत असतो.

सर्कशींचे भवितव्‍य धोक्‍यात आलेले असताना, भविष्यात पोटापाण्यासाठी करायचे काय, असा गहन प्रश्‍न समोर असतानाही चेहऱ्यावर तसूभरही चिंता जाणवू न देता, हा जोकर लोटपोट हसवल्‍यावाचून राहात नाही.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

कदाचित मी शेवटचा जोकर..

आपल्‍या जीवन प्रवासाविषयी महम्मद शाहीद म्‍हणाला, की आता मुळात सर्कशीचे भवितव्‍य धोक्‍यात आहे. त्‍यात कुणीही स्वतःचा विनोद करून घ्यायला जोकरची भूमिका बजावत नाही. त्यामुळे मी शेवटचा जोकर असणार, असे भावुक विधान त्‍याने केले.

जेव्‍हा प्रेक्षक आपल्‍या विनोदांना हसतात, तेव्‍हा जगण्याचा सर्व संघर्ष विसरुन जातो. प्रेक्षकांना हसवायचे म्‍हणून खेळ सुरू होण्यापूर्वी मेकअप करतो. खेळ नसेल तेव्‍हा प्रेक्षकांना कशा प्रकारे हसवता येईल, यासाठी सराव करतो, असेही तो ओघाने म्‍हणाला.

जीवनात कर्माची महती अपार

जीवनात कर्माची महती अपार असून, भगवद्‌गीतेतील अनेक श्र्लोकांमध्ये याबाबत उल्‍लेखही आलेला आहे.

ज्ञेय: स नित्यसंन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ् क्षति |

निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ||

अर्थात जी व्‍यक्‍ती ना कर्मफळांवर घृणा करत, ना कर्मफळांची इच्‍छा बाळगतात.. असे व्‍यक्‍ती नित्‍य संन्‍यासी म्‍हणून ओळखले जातात. हे अर्जुना.. मनुष्य समस्‍त द्वन्दांनी रहित होऊन भवबंधनास पार करत पूर्णतः मुक्‍त होत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT