CET Exam esakal
नाशिक

Nashik : विधी, शिक्षणशास्‍त्र सीईटी नोंदणीची 22 पर्यंत मुदत

अरूण मलाणी

नाशिक : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या (vocational courses) प्रवेशासाठी सीईटी परीक्षा (CET Exam) घेतली जाणार आहे. ऑगस्‍टमध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षांना समोरे जाण्याची अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी सीईटी सेलने नोंदणीसाठी मुदत वाढविली आहे. या अंतर्गत विधी (Law) व शिक्षणशास्‍त्र (Pedagogy) अभ्यासक्रमांच्‍या सीईटीसाठी २२ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर एम.पीएड. अभ्यासक्रमासाठी ७ जुलैपर्यंत नोंदणीची संधी असेल. (Law Education CET registration deadline up to 22 june Nashik News)

विधी शाखेतील पदवीनंतर एलएलबी (३ वर्षे) आणि बारावीनंतर एलएलबी (५ वर्षे) या शिक्षणक्रमांच्‍या सीईटी नोंदणीसाठी २२ जूनपर्यंत मुदत वाढविली आहे, तसेच शिक्षणशास्‍त्र विद्या शाखेतील बी.एड.-एम.एड. हा इंटिग्रेटेड पदवी-पदव्‍युत्तर अभ्यासक्रम, एम.एड., बीए.बी.एड./बी.एस्सी.बीएड. हा संयुक्‍त पदवी अभ्यासक्रम, बी.पीएड. अभ्यासक्रमाच्‍या सीईटीसाठी २२ जूनपर्यंत नोंदणी करता येईल. तर एम.पीएड. या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीची ७ जुलैपर्यंत मुदत असेल.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी होत असलेल्‍या या प्रक्रियेंतर्गत शिक्षणशास्‍त्र व विधी शाखेतील अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर आता या नोंदणी प्रक्रियेला आणखी प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT