Water leak at Bella D'Souza Garden  esakal
नाशिक

Water Wastage : जलकुंभाचे मुख्य वाहिनी लिकेज; मनपाचे समस्येकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Water Wastage : जेलरोड भागाला लाखो लोकांना पाणीपुरवठा करणारी नाशिक रोड येथील भीमनगरच्या बेला डिसूझा गार्डन येथील जलकुंभाचे मुख्य वाहिनी लिकेज असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

या समस्येकडे मनपाने दुर्लक्ष केले असून महापालिकेचे ऑनलाइन ॲप कार्यरत नसल्यामुळे तक्रार कुठे करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (leakage in main channel of water tank at Bella DSouza Garden nashik news)

लाखो लोकांना नाशिक रोड येथील भीमनगरच्या बेला डिसूझा गार्डन येथील जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा होतो. या जलकुंभाची मुख्य वाहिनी लिकेज असून हजारो लिटर पाणी सध्या वाया जात आहे. येथे पाणी लिकेज झाल्यामुळे डास, माशा यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पर्यायाने आसपासच्या परिसरात रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पाण्याच्या टाकीच्या खाली मोठे डबके साचले आहे. रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे शिवाय या ठिकाणी वाढलेल्या वनस्पतींमुळे परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. हा जलकुंभ गार्डनमध्ये असल्यामुळे या ठिकाणी रोजच रात्रीच्या वेळेमध्ये मद्यपीचा धिंगाणा असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या ऑनलाइन तक्रारींचे महापालिकेचे ॲप बंद असल्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, हा असा प्रश्न सध्या नागरिकांना सतावत आहे.

"या ठिकाणी रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिकेचे बंद असल्यामुळे आम्ही तक्रार कुठे करायची, प्रशासकीय राजवटीत महापालिकेने किमान जलकुंभाची स्वच्छता आणि निगा राखायला हवी. या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगराई पसरू शकते म्हणून महापालिकेकडून उपाययोजनांची अपेक्षा आहे." - राहुल महाले, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT