RTE selection and waiting list on Monday satara sakal
नाशिक

आरटीई प्रवेशासाठी आज सोडत; उद्यापासून प्रवेश निश्‍चिती

प्रवेशासाठी १९ पर्यंत मुदत, लॉटरीबाबत पोर्टलवर जाऊन तपासा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के राखीव जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता सुरु असलेल्‍या या प्रक्रियेअंतर्गत उद्या (ता.४) दुपारी चारला सोडत जाहीर केली जाणार आहे. मंगळवार (ता.५) पासून १९ एप्रिलपर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली जाणार आहे.

मागास, आर्थिकदृष्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्‍ध होण्यासाठी राज्‍य शासनातर्फे मोफत प्रवेशाची योजना राबवते आहे. या अंतर्गत खासगी शाळांमधील पंचवीस टक्‍के जागा अशा घटकांकरीता राखीव ठेवल्‍या जात असतात.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन स्‍वरुपात अर्ज मागविण्यात आले होते. त्‍यास पालकांचा चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता. प्रवेश प्रक्रियेच्‍या पुढील टप्यात उद्या (ता.४) सोडत जाहीर होणार आहे. निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांसह प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. यादीनुसार प्रवेशाची प्रक्रिया करण्याची प्रक्रिया मंगळवार (ता.५) पासून सुरु होणार आहे.

अशा आहेत सूचना

यासंदर्भात शिक्षण विभागाने सूचना जारी केल्‍या आहेत. त्‍यानुसार उद्या (ता.४) दुपारी चारनंतर आरटीई पोर्टलवर यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएस प्रप्त होतील. परंतु फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती करुन घेण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील स्‍थिती

जिल्‍हा - शाळा- उपलब्‍ध जागा - दाखल अर्ज

नाशिक - ४२२ - ४,९२७ - १६,५६७

जळगाव - २८५ - ३,१४७ - ८,३५४

धुळे - ९६ - १,०७४ - २,६६६

नंदुरबार - ४७ - ३३४ - ७८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT