नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- बिबट्याच्या हल्ल्यात नगावला बैल मृत्युमखी धुळे : नगाव (ता. धुळे) परिसरात बिबट्याने शेतात बांधलेल्या बैलावर हल्ला करून त्याला ठार केले. हरीश भाईदास पाटील यांच्या शेतात ही घटना घडली. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील बैलांना शनिवारी (ता. १७) सायंकाळी चारा-पाणी करून बांधून ठेवल्यानंतर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शेतातील बैलावर हल्ला झाल्याने चिंता वाढली आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने गस्त वाढवावी, परिसरात कॅमेरे लावावेत आणि आवश्यकतेनुसार पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे. बिबट्याच्या वावरामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांत भीती आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. - तरुणाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा धुळे : थट्टा-मस्करीतून झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुकानाच्या पायरीवर आपटून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सोनगीर (ता. धुळे) येथे घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पंधरा ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल दीपकच्या पाठीमागील गल्लीत हा प्रकार घडला. फिर्यादी आदील शेख रशीद शेख (वय २८, रा. आयेशा कॉलनी, सोनगीर) हा त्याचा मावसभाऊ अल्तमश खाटीक यांना सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी फारूख समद मन्यार याने आदील शेख याला उचलून रस्त्याकडेला दुकानाच्या पायरीवर आपटले. तसेच अन्य चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावरून फारूख समद मन्यार, मोहसीन समद मन्यार, रफीक समद मन्यार, फैजान आरीफ मन्यार आणि फरान समद मन्यार (सर्व रा. सोनगीर, ता. धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - सोन्याचे मणी घेऊन अनोळखी व्यक्ती पसार धुळे : शिंदखेडा शहरातील अलंकार ज्वेलर्सची एकाने सुमारे ६० हजारांचे १४ ग्रॅम सोन्याचे मणी लांबवून फसवणूक केल्याची घटना घडली. तीस सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास शिंदखेडा येथील शनी मंदिर गल्लीतील अलंकार ज्वेलर्स या दुकानात अंदाजे ३५ ते ४० वयाचा एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने ६० हजारांचे १४ ग्रॅम सोन्याचे मणी परत न करता ते स्वतःजवळ ठेऊन अपहार केला आणि फसवणूक करून पळ काढला. याबाबत दुकान मालक रामकृष्ण विसपुते (रा. शनी मंदिर गल्ली, शिंदखेडा) यांच्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवर सहा ऑक्टोबरला रात्री नऊच्या सुमारास अपघात झाला. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक वाहन सोडून पसार झाला. शोएब महमूद खाटीक (रा. धुळे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीने (एमएच १८ बीएफ ९९१३) चाळीसगाव रोडने जात असताना त्यांना भरधाव कारचालकाने (एमएच ०२ सीएच ७३६७) दुभाजकाच्या कटमधून वळण घेऊन धडक दिली. यात खाटीक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हबीब सत्तार खाटीक (रा. बरकत मशिदीच्या मागे, खाटीकवाडा, चाळीसगाव रोड, धुळे) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT