leopard sinner.jpg
leopard sinner.jpg 
नाशिक

७ फुटी तारेचे कंपाउंड ओलांडत कुत्र्याची शिकार; सिन्नर मिरगावला बिबट्याचा उच्छाद सुरूच 

अजित देसाई

सिन्नर (जि.नाशिक) : गेल्या दिवसांपासून सिन्नरच्या पूर्व भागात मिरगाव-शहा शिवारात बिबट्यांच्या जोडीने ठाण मांडले आहे. बुधवारी रात्री हिंगे वस्तीवर पाळीव कुत्र्याला जखमी केल्यावर आज (ता.9) मध्यरात्री पुन्हा एका कुत्र्याची शिकार बिबट्याने केली.

सकाळी उठल्यावर घोडेराव कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात

शहा - मिरगाव रस्त्यालगत प्रभाकर काशिनाथ घोडेराव यांची वस्ती आहे. घराला संरक्षणासाठी 7 फूट उंचीचे तारेचे कंपाउंड असून हे कंपाउंड ओलांडत बिबट्याने आपला डाव साधला. परिसरात बिबट्या असल्याने घोडेराव कुटुंबीयांनी घराजवळ आपला जर्मन शेफर्ड कुत्रा बांधून ठेवला होता. बिबट्याने शिकारीवर ताव मारून आल्या पावली पळ काढला. सकाळी उठल्यावर घोडेराव कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला.

पिंजऱ्यात ठेवायला शेळी मिळेना
बुधवारी बिबट्याने दोन वस्त्यांवर दर्शन दिल्यावर गुरुवारी वनविभागाकडून पाहणी करण्यात आली. जवळच्या शिंदेवाडी परिसरात लावलेला पिंजरा शुक्रवारी सकाळी मिरगावला आणण्यात आला. या पिंजऱ्यात ठेवण्यासाठी रात्रभर कोणी शेतकरी शेळी देईना. त्यामुळे कोंबड्या विकत घेऊन त्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्या. शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान हिंगे व बैरागी वस्तीवर बिबट्यांची जोडी पुन्हा आढळून आली होती. त्याअगोदर शहा शिवारात ही जोडी रस्ता ओलांडताना शेतकऱ्यांनी पहिली होती.  बिबट्याचा बंदोबस्त करा असे संगणारे शेतकरी पिंजऱ्यात ठेण्यासाठी सहकार्य म्हणून शेळी देत नसतील तर वनकर्मचाऱ्यांनी करायचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT