Leopard  esakal
नाशिक

नाशिक : गिरणारे-साडगाव रस्त्यावर बिबबट्याचा मजुरावर जीवघेणा हल्ला

नाशिक : गिरणारे-साडगाव रस्त्यावर बिबबट्याचा मजुरावर जीवघेणा हल्ला

विनोद बेदरकर

गिरणारे/गंगापूर (जि. नाशिक) : गिरणारे-साडगाव रस्त्यावर असलेल्या मळ्यातील राजाभाऊ थेटे यांच्या शेतातील शेतमजुरावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. रविवारी (ता. १०) पहाटे ६.०० वाजता हा हल्ला बिबट्याने केल्याचे कळते. दरम्यान जखमी मजुरास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. आळंदी धरण, धागुर परिसरात गेल्या काही महिन्यांपूर्वी मजुरांच्या मुलीला बिबट्याने ठार केले होते, तर नाईकवाडी परिसरात शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले होते. तसेच गिरणारे-साडगाव रस्त्यावर बिबट्याचा सातत्याने धुमाकूळ आहे. या परिसरात रात्री-बेरात्री शेतकरी साडगाव रस्त्यावर प्रवास करतांना घाबरतात, इतकी बिबट्याची दहशत आहे. रात्री बेरात्री शेतकरी शेतात काम ही करत नाहीत. शालेय मुलं रस्त्याने जाताना घाबरतात अशी परिस्थिती आहे. आजच्या शेतमजूरावरील हल्ल्याने तर नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. घटनेची खबर मिळताच वन विभागाने या भागात पिंजरा लावल्याचे कळते.

''गिरणारे, वाडगाव, दाबडगाव, साडगाव, नाईकवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याच्या भीतीने शेत वस्त्यांवर शेतकरी कुटुंबे जीव मुठीत धरून राहतात. रात्री-बेरात्री घरी येतांना भीती नेहमीचीच. वन विभागाने बिबट्याचा शोध घेऊन नागरिकांमधील भीती दूर केली पाहिजे. बिबट्याचे हल्ले व बिबट्या दिसल्याच्या घटना कायम आहेत. - पुंडलीकराव थेटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Fifa World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा पराक्रम! लिओनेल मेस्सी, रोनाल्डोला सोडलं मागे; फ्रान्सच्या विजय अन् बाद फेरीत प्रवेश

Beed: प्रेमप्रकरणातून हॉटेलमध्ये २ गटात राडा, मध्यस्थी करायला गेलेल्या मालकालाच संपवलं; 9 जणांवर गुन्हा दाखल

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण सामंजस्य कराराचे डोवाल यांच्याकडून स्वागत

SCROLL FOR NEXT