Leopard Attack News esakal
नाशिक

Nashik : घराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : मागील महिन्यात म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील जाधव-देशमुख वस्तीवर पाच वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच रविवार (ता.७) रोजी मोराडे इस्टेट येथील मोरे वस्ती येथे एका युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रात्री बारा ते साडे बाराच्या सुमारास घडली.

यात युवकाच्या डाव्या हाताला बिबट्याचे दात लागले असून बराच रक्तस्त्राव झाला आहे.त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. (leopard attack youth who was sleeping in courtyard outside house Nashik Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ येथील मोराडे इस्टेट भागात शेतकऱ्याच्या बऱ्याच वस्त्या आहेत, याच ठिकाणी मोरे कुटुंबीयांची यांची शेती आहे आहे. ही शेती बंडू नाना थाळकर कुटुंब सांभाळत असून त्याच जवळपास वीस ते बावीस जणांचं कुटुंब वास्तव्य करते.

यातील काही सदस्य शेतमजूर म्हणून काम करतात तर काही खाजगी कंपनीत काम करतात.त्यांच्या कुटुंबातील जवळपास दहा ते बारा सदस्य हे घरा बाहेरच्या अंगणात झोपलेले होते.रात्री बारा ते साडे बाराच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने भारत बंडू थाळकर वय ४० यांचे हल्ला चढविला त्यांच्या डाव्या हाताला धरून ओढत घेऊन चालला होता.

इतर सदस्यांचा आरडाओरडा सुरू होता .मात्र,त्यावेळी भारत याने बाहेर असलेल्या चुली जवळील लाकूड उजव्या हातात घेऊन बिबट्यास मारले.अन् बिबट्याने धूम ठोकली.या हल्ल्यात भारत यांच्या डाव्या हाताला बिबट्याचे तीन ते चार दात चांगलेच लागले असून रक्तस्त्राव झालं आहे.शासकीय रुग्णालयात उपचार दाखल केले होते. सुदैवाने भारत थाळकर याचे प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT