Leopard cubs esakal
नाशिक

आंबोली शिवरातील मक्याच्या शेतात आढळले बिबट्याचे पिल्लू

ज्ञानेश्वर मेढे

आंबोली (जि. नाशिक) : आंबोली (ता. त्र्यंबक) येथील शिवारात बिबट्याचे पिल्लू आढळून आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आंबोली शिवारात दुपारच्या सुमारास बबन लक्ष्मण मेढे हे आपल्या मक्याच्या शेतात पाणी भरत असताना त्यांना साधारण एक महिन्याचे बिबट्याचे पिल्लू आढळून आले.

याबाबतची माहिती त्यांनी पोलिस पाटील ज्ञानेश्वर मेढे-पाटील यांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच नवनाथ गोरे (वनरक्षक अंबाई), श्यामराव गायकवाड (वनपाल अंबाई), नवनाथ गोरे (वनरक्षक अंबाई), कैलास महाले (वनरक्षक) यांनी तात्काळ जाऊन पिल्लाची खात्री करण्यात आली. राजेश पवार RFO यांना घटनेची माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली बिबट्याचे पिल्लू लहान असल्यामुळे पिल्लाला तिच्या आईच्या ताब्यात देण्याचे ठरवले. त्यानुसार Eco foundation चे सभासद अभिजित यांच्याशी संपर्क करून घटनास्थळी बोलावले. सदर पिल्लास सुरक्षितरित्या शेतात ठेऊन बिबट्याची आई रात्री 7.55 वा सदर पिल्लू घेऊन गेली.

सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला, अश्या प्रकारे बिबट्याच्या पिल्लाला सुखरूप त्याच्या आईकडे देण्यात आले, यावेळी काहीशी भीती येथील शेतकरी यांच्या मनात निर्माण झाली असून, शेतात काम करण्यासाठी जीव मुठीत धरून जावं लागणार आहे अशी भीती व्यक्त करण्यात आली. येथे बिबट्याचा वावर असल्यामुळे काहीप्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT