इगतपुरी (नाशिक) : वाकी (ता. इगतपुरी) धरणाच्या पश्चिम दिशेकडे पिंपळगाव भटाटा गावाच्या गांगडवाडी येथे कुत्र्याला भक्ष्य करण्यासाठी धाव घेणारा बिबट्या झोपडीवजा घरात शिरला. आणि गांगडवाडी लोकवस्ती हादरली. ही घटना मंगळवारी (ता. ५) दुपारी दोनच्या सुमारास घडली. काय घडले पुढे वाचा...
भक्ष्याच्या शोधात जेव्हा बिबट्या झोपडीत शिरतो तेव्हा..!
वैतरणा मार्गावर पश्चिम बाजूस पिंपळगाव भटाटा या गावाच्या गांगडवाडी या छोट्याशा गावाच्या परिसरात बिबट्या असल्याची चाहूल येथील नागरिकांना यापूर्वीच लागलेली होती. मात्र त्याचा उपद्रव नसल्याने ग्रामस्थ बेसावध होते. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास गांगडवाडी येथे बिबट्या कुत्र्याच्या भक्ष्यासाठी त्याच्या मागे धावत असताना येथील गोविंद बच्चू हिंदोळे यांच्या घरात बिबट्या शिरला. त्या घरातील वृद्ध गोविंद हिंदोळे ओट्यावर बसलेले असल्याने घराचा दरवाजा उघडाच होता. बिबट्या घरात शिरल्याचे लक्षात येताच त्यांनी सावध होत घराचा दरवाजा बंद करीत ग्रामस्थांना माहिती दिली. त्यात ज्या कुत्र्याचा मागे बिबट्या आला ते कुत्रेही दरवाजाच्या फटीतून बाहेर पळाले. सरपंच बळवंता हिंदोळे यांनी वन विभागाला माहिती दिली.
हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड
बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी
घटनेची माहिती समजताच इगतपुरी वन विभागाचे पथक घटनास्थळी पोचले. रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, ही बाब समजताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. एका बाजूला बिबट्या जेरबंद करण्याचे आव्हान, तर दुसऱ्या बाजूला गर्दी दूर करण्याचे जिकिरीचे काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.
हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला
बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी प्रयत्न
वन विभागाला ही माहिती मिळताच वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल जाधव, भाऊसाहेब राव, नावकर, गाडर, सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करीत बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.