Leopard esakal
नाशिक

Nashik : YCMOU विद्यापीठात बिबट्याचा वावर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात बिबट्याचा मुक्त वावर असून, रविवारी (ता.४) रात्री बिबट्याने श्‍वानाच्या पिल्लावर झडप घेत त्यास फस्त केले. यानंतर वनविभागास या घटनेची तत्काळ माहिती देण्यात आली. मुक्त विद्यापीठातील बिबट्याच्या वावरामुळे येथील परिसरात दहशतीचे वातावरण झाले आहे. (Leopard in YCMOU University Nashik Latest News)

शहरासह लगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. रविवारी (ता. ४) रात्री पावणेदहाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कुलगुरू निवासस्थानाजवळ असलेल्या श्‍वानाच्या पिल्लावर बिबट्याने झडप मारत त्यास ओढून नेले.

या सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. घटनेची माहिती तत्काळ वनविभागास देण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या सर्वांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वीदेखील मुक्त विद्यापीठात दोन ते तीन वेळा येथील स्थानिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.

लहवित येथे बिबट्या जेरबंद

लहवित येथील पाळदे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये पहाटे एक बिबट्या (मादी) जेरबंद झाली आहे. लहवित परिसरातील बिबट्याच्या मुक्त संचारामुळे या ठिकाणी स्थानिकांच्या मागणीनुसार राजाराम पाळदे यांच्या शेतात पिंजरा लावला होता.

या पिंजऱ्यात सोमवारी (ता. ५) पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाने सदर ठिकाणी जात पाहणी केली. हा बिबट्या सुमारे ३ ते ४ वर्षाचा असून, त्यास वनविभागाने तत्काळ ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT