Leopard  esakal
नाशिक

Nashik News : दरेगाव शिवारात बिबट्याची दहशत

सकाळ वृत्तसेवा

चांदवड (जि. नाशिक) : दरेगाव (ता. चांदवड) व गिरणारे (ता. देवळा) शिवारात बिबट्याच्या दहशीतीने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Leopard terror in Daregaon Shivara Nashik News)

दरेगाव येथील रहिवासी भगवान बाबूराव सोनवणे गिरणारे शिवारातील शेतात राहतात. शेतातील घराजवळ जनावरे व वासरु बांधलेले होते. गुरुवारी (ता. १५) पहाटेच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला. भगवान सोनवणे यांचे लहान भाऊ पहाटेच्या सुमारास उठले असता त्यांच्या वासरावर हल्ला झाल्याचे लक्षात आले.

सोनवणे यांनी गिरणारे येथील पोलिसपाटील अनिल वाघ यांना कळविले असता त्यांनी देवळा वनविभागाला कळविले. वनविभाग कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली. पायाचे ठसे तपासले. तपासाअंती बिबट्याचे पायाचे ठसे असल्याचे निष्पन्न झाले. या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

दरेगाव व गिरणारे (ता. देवळा) शिवारात डोंगरदऱ्याचा भाग असल्याने याठिकाणी बिबट्या व वन्यप्राण्यांचा वावर आहे. या परिसरात माळ व डोंगर भागात दरेगाव येथील शेतकऱ्यांची शेती असल्याने बरेच शेतकरी शेती व्यवसायासाठी याठिकाणी राहतात. थेच जनावरे बांधतात.

बिबट्याचा वावर असल्याने यापूर्वी गाई, वासरे व मेंढपाळांच्या घोड्यांचां फडशा पाडल्याचे निर्दशनास आले आहे. रात्रीच्या वेळी कांदा पिकाला पाणी भरण्यासाठी शेतकरी जातात. मात्र, बिबट्याच्या दहशीतीने कांद्याना पाणी न भरता तसेच घरी परतावे लागते. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

श्रेयस, सॅमसन की पांड्या... टीम इंडियाच्या नवा ट्वेंटी-२० कर्णधार कोण? BCCI ने अखेर उत्तर दिले; म्हणाले, सूर्यकुमार यादवला बदलण्याची चर्चा...

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये बाजारात भीषण बॉम्बस्फोट; नऊ जण ठार, ३० जखमी

Mumbai: धारावी पुनर्विकासासाठी नगरसेवक रणांगणात; ‘प्रलंबित’ प्रकरणांचा होणार अखेर निर्णय, तिढा सुटणार!

SCROLL FOR NEXT