CP Deepak Pandey esakal
नाशिक

‘ते’ पत्र व्‍हायरल झाले कुठून? विशेष शाखेकडे तपास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महसुली यंत्रणेबाबत धगधगत्‍या मजकुरासह विविध उपाययोजनांवर आधारित पोलिस आयुक्‍त दीपक पांडे यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलेले पत्र वादाच्‍या भोवऱ्यात सापडले आहे. मात्र, ते पत्र व्‍हायरल होऊन माध्यम प्रतिनिधींपर्यंत आले कसे, याचा तपास करण्याच्या सूचना विशेष शाखेस देण्यात आल्या आहेत.

महसूली अधिकारी आरडीएक्स, तर कार्यकारी दंडाधिकारी डिटोनेटर असल्याच्या उल्लेख असलेले पत्र पोलिस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) यांनी पोलिस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, नंतर ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर विभागातील संपूर्ण महसुली यंत्रणा पोलिस आयुक्‍तांविरोधात एकजूट झाली. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पत्रावर थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat)यांनी नाराजी व्‍यक्‍त केल्‍यानंतर आयुक्‍त पांडे यांनी माफी मागितली होती. मात्र, पत्रावर आपण ठाम असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माफीची मागणी केली असून, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्‍यान, तत्‍पूर्वी राजकीय दबावामुळे बदली करण्याबाबतचे पत्रही पोलिस आयुक्त पांडे यांनी महासंचालकांना पाठविले होते. अशात पोलिस आयुक्‍तांनी २३ मार्च व २ एप्रिलला पोलिस महासंचालकांना पाठविलेली ही दोन्‍ही पत्रे प्रसार माध्यमांच्‍या प्रतिनिधींकडे कशी पोचली, याबाबतची चौकशी होणार आहे. यासंदर्भातील तपास विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक सुरेखा पाटील यांच्‍याकडे सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT