नाशिक

सार्वजनिक वाचनालय वार्षिक सर्वसाधारण सभा

CD
मेन फोटो : H34218,H34219 --- मुकलेल्या सभासदांना सभासदत्व देण्यास तयार ‘सावाना’च्या वार्षिक सभेत अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांची भूमिका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १: गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत वैचारिक मतभेदातून कोणत्याही संस्थेमधून सभासदाचे सभासदत्व काढले जाऊ नये. अशी वैयक्तिक भूमिका मांडत, वाचनालयाच्या सभासदत्वाला जी मंडळी मुकली आहेत, त्यांना वाचनालयाचे सभासदत्व देण्यासाठी संचालक मंडळाचा अध्यक्ष म्हणून तयार आहे. मात्र, त्यासाठी नियमांची पूर्तता करूनच सभासदत्व दिले जाईल, अशी भूमिका वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी घेतली. सार्वजनिक वाचनालयाची १८६वी वार्षिक सभा रविवारी (ता. १) संस्थेच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पार पडली. निवडणूक पूर्वीची कार्यकारी मंडळाची अखेरची सभा असल्याने सभासदांचे किरकोळ आक्षेप वगळता सभा खेळीमेळीत पार पडली. २० एप्रिलपासून आत्तापर्यंत सुरू केलेली ग्रंथमोजणी, तसेच २०२४ मध्ये झालेल्या सभेत थकबाकीदार सभासदांसाठी ‘अभय’ योजना राबविली होती. त्यानुसार सभासदांकडे किती कालावधीपासून पुस्तके शिल्लक आहे, त्याची माहिती ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी दिली. सभासद रमेश देशमुख, विनोद राठोड, सुहास भणगे, राजू देसले यांनी सभेत विविध सूचना केल्या. सुरवातीला उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी स्वागत केले. श्रद्धांजली व अभिनंदनाचा ठराव जयेश बर्वे व देवदत्त जोशी यांनी मांडला. कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. वार्षिक अहवाल प्रमुख सचिव गिरीश नातू यांनी सादर केला तर, अर्थसचिव प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी ताळेबंद जमाखर्च व अंदाजपत्रक सादर केले; त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. व्यासपीठावर जयप्रकाश जातेगावकर, सुरेश गायधनी, प्रेरणा बेळे, धर्माजी बाेडके, ॲड. अभिजित बगदे, गणेश बर्वे, प्रशांत जुन्नरे, मंगेश मालपाठक उपस्थित हाेते. आभार उपाध्यक्ष प्रा डॉ. सुनील कुटे यांनी मानले. -- सभेतील ठळक मुद्दे -मिनी थिएटर्स तीन महिन्यात पूर्ण होण्याची ग्वाही -मुलांच्या पानसे अभ्यासिकेतील फर्निचर बदलणार -मुलींच्या अभ्यासिकेचे काम अंतिम टप्यात -स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी ‘नाशिक रन’ कडून निधी -दोन लिफ्टसाठी मनपाची परवानगी ; लवकर कामाला सुरवात -नारायण सुर्वे, महात्मा फुले यांच्यावर एकदिवसीय कार्यक्रम डिसेंबरमध्ये. --- फिरते वाचनालय योजना बंद प्रायोगिक तत्त्वावर डिसेंबर २०२३ मध्ये सुरू केलेले ‘लायब्ररी ऑन व्हील’ला (फिरते वाचनालय) वाचकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मागणीपेक्षा खर्च अधिक झाल्याने योजना बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी संकेतस्थळ अद्ययावत करून वाचकांना हवी असलेल्या उपलब्ध पुस्तकांची माहिती एका क्लिकवर तसेच पुस्तक वाचकांपर्यंत घरपोच पोहोचविण्यासाठी ‘पोर्टर’ सारख्या सुविधेचा लाभ घेता येईल याबाबत विचार सुरू आहे. ---चौकट सभासद करून घेण्याची मेख सभेत काही सभासदांनी सभासदत्व रद्द केलेल्या सभासदांना पुन्हा सभासद करून घेण्यात यावे, याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. तर, अंतर्गत कायदेशीर वाद आणि न्यायालयीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सभासद वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, रमेश जुन्नरे, दिवंगत सभासद मधुकर झेंडे व इतरांना दिलेले सभासदत्व रद्द करण्यात करण्यात आले. त्यावर अध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या सभासदांना जुने सभासदत्व अपेक्षित आहे. कारण पुढील वर्षी मे-जून महिन्यात संस्थेची निवडणूक असल्याने रद्द झालेल्या सभासदांना नव्याने सभासदत्व द्यावयाचे ठरल्यास घटनेच्या नियम ११ (आ) नुसार नवोदित सभासदांना कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार नाही. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT