नाशिक

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला महिना अखेरीस सादर करावा

CD
महिना अखेरीपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा कंधाणे, ता. ६ : शासनाच्या निवृत्तीवेतन धारकांना चालू वर्षातील हयातीचा दाखला मिळविण्यासाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले असून ३० नोव्हेंबर २०२६ अखेर मुदतीत दाखला सादर करावा अन्यथा डिसेंबर‌पासून संबंधितांना पेन्शन मिळणार नाही असे बागलाण तालुका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे शासकीय निवृत्तीवेतन धारकांना दरवर्षी हयात असल्याचा पुरावा म्हणून हयातीचा दाखला सादर करावा लागतो त्यानुसार दरमहा त्यांच्या बँक खात्यात पेन्शन जमा केली जाते. ज्येष्ठ वयोवृद्ध पेन्शन धारकांना कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे व बॅंकांमधील रांगेत ताटकळत उभे राहून होणारा त्रास वाचविण्यासाठी व अखंडित निवृत्ती वेतन सुरू राहण्यासाठी मुदतपूर्व हयात प्रमाणपत्र सादर करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून दाखला मिळविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत त्यांच्या आधारे हयात‌ प्रमाणपत्र सहज मिळणार आहे त्यामुळे निवृत्ती वेतन वितरणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व निवृत्तीवेतन व कुटुंब वेतनधारकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा तसेच ऑफलाईन दाखला व सोबत आधार कार्ड पॅन कार्ड बॅंक पासबुक पहिलं पान झेरॉक्स प्रती लवकरात लवकर आपापल्या कार्यालयातील विभाग प्रमुखांकडे ३० नोव्हेंबर पुर्वी सादर करावा असे आवाहन प्रशासनाकडून परिपत्रक काढून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT