saved life.jpg 
नाशिक

'ती' आडलेल्या अवस्थेत...पण, काय अन् कसं करायचं 'त्यांना' काहीच माहिती नव्हतं...शेवटी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (दिंडोरी) देव मदतीला येतो असं खूपदा म्हटलं जाते. पण, माणुसकीतला देव भेटायला नक्कीच नशीब लागतं. गाय गतप्राण होण्याच्या मार्गावर असतांना त्यांनी मदत करुन गाय अन्‌ वासराचे प्राण वाचविल्याची घटना समोर आली. मुक्‍या प्राण्यांवर दया करावी, असे म्हटले जाते. परंतू असे क्वचितच लोक मदत करतात. मानवतेच्या भावनेतून त्यांना गाय व वासराचे प्राण वाचविण्यात यश आले.  

असा आहे प्रकार

रविवारी (ता. 15) सायंकाळी चारला एक गाय व तिच्या वासराचा जीव वाचविण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवारी एनडीएसटी सोसायटीच्या मासिक बैठकीनिमित्त काही तरुण गेले असता, जिल्हा परिषदेच्या मागे दुपारपासून एक गाय आपल्या वासराला जन्म देतांना खूप आडल्याचे लक्षात आले. मानवतेच्या भावनेतून मदत करण्याची खूप इच्छा होती; पण काय आणि कसं करायचं हे काहीच माहिती नव्हतं. पण गायीच्या तीन-चार तासांपासून चाललेल्या वेदना पाहवत नव्हत्या. गाय गतप्राण होण्याच्या मार्गावर होती. शेवटी मोहन चकोर, एनडीएसटीचे संचालक अरुण पवार, दत्तात्रेय आदीक व कल्पेश चव्हाण यांनी प्रयत्न करून आडलेल्या गायीचे वासरू बाहेर हळूच ओढून काढल्याने गायीने सुटकेचा निःश्‍वास टाकला. आता गाय व वासरू सुखरूप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT