woman crying 1.jpg 
नाशिक

थरारक! गळा चिरलेल्या महिलेसमोर जणू देवदूतच उभा होता...काय घडले नेमके?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या गुरुवारी (३० जुलै) घरगुती वादातून पती दीपक पवार याने पत्नी पूजा पवार हिच्या गळ्यावर वस्त्याऱ्याने वार केला. यात तिच्या गळ्यावर खोलवर जखम झाली. रक्ताच्या थारोळ्यात पत्नीला सोडून पती तर केव्हाच निघून गेला होता. त्यानंतर जे घडले ते अंगावर काटा आणणारे होते.

काय घडले नेमके?

पंचवटीतील समर्थनगरमध्ये संशयित पतीने पत्नीच्या गळ्यावर वस्त्याऱ्याने वार करीत तिचा गळा चिरला. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता, तिची श्वास नलिकाच इजा पोहोचली होती. सिव्हिलमध्ये आणले असता, इएनटी सर्जन डॉ संजय गांगुर्डे यांनी कोणताही विलंब न लावता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यात तिच्या श्वासनलिकेला इजा पोहोचली असल्याने तिच्या जीवाला धोका होता. मात्र डॉ गांगुर्डे यांनी अतिशय संयमाने आणि धीराने घेत यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि पूजा पवार या ३२ वर्षीय विवाहितेचा जीव वाचविला.

जगण्याशी शक्यता नसतानाही ती वाचली केवळ डॉक्टरमुळेच

एकीकडे रुग्णाचा जीव गेला म्हणून डॉक्टरांवर हल्ले होत असताना, यातील एका डॉक्टरमुळे एका महिलेचा जीव वाचला हेही समाजाने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे तिची जगण्याशी शक्यता नसताना तिच्यासाठी डॉ संजय गांगुर्डे मात्र देवदूतासारखे धावून आले आणि तिचे प्राण वाचले. यावर डॉ संजय गांगुर्डेनी मात्र सांगितले की जगण्याची शक्यता नसतानाही प्रयत्न केले. तिचा जीव वाचविल्याचे समाधान मिळाले.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT