jail
jail sakal
नाशिक

नाशिक : महिलेला पेटविल्याप्रकरणी एकास आजन्म कारावास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीत महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याप्रकरणी एकाला आजन्म कारावासाची शिक्षा झाली. रवींद्र नाना भामरे (वय ३९, हरिसिद्धी अपार्टमेंट कृष्णनगर पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक दोनच्या न्यायधीश श्रीमती एम. व्ही. भाटिया यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.(life imprisonment for burning woman)

पंचवटीच्या कृष्णनगर भागातील हरिसिध्दी अपार्टमेंटमध्ये ३१ मार्चला सकाळी सातला रेखा बाळू मोरे (वय ४०) या विवाहितेला घरी पतीच्या मित्राने रॉकेल ओतून पेटवून दिले होते. मृत विवाहिता रेखा मोरे यांचा पती आणि आरोपी रवींद्र भामरे मित्र होते. आरोपी तब्बल १३ वर्षांपासून त्यांच्याच घरी रहायचा. मात्र, मृत महिलेने त्याला दुसरीकडे भाड्याने रहायला सांगितले. त्यावरुन रेखा व तिच्या पतीच्या मित्रात वाद झाले होते. वादाचे पर्यवसनातून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करून गुन्हा शाबीत होण्यासाठी आवश्यक पुराव्यांसह जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.(nashik news)

या खटल्याची जिल्हा व सत्र न्यायालय दोनच्या न्यायधीश एम. व्ही. भाटीया यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात आरोपीविरोधात गुन्हा शाबित झाला. न्यायालयाने त्याला खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे आणि सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले, तर पैरवी आधिकारी म्हणून हवालदार एम. एम. पिंगळे, एस. एल. जगताप, पी. डी. सारंगधर, हवालदार पी. आर. चौधरी यांनी पाठपुरावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT