नाशिक

तुलना करायची सोडली तर जीवन सुंदर प्रा. हेमंत टिळे यांचे शताब्दी स्कलमध्ये जयकर व्याख्यानमालेत प्रतिपादन

CD
तुलना करणे सोडल्यास जीवन सुंदर प्रा. हेमंत टिळे ः शताब्दी स्कूलमध्ये जयकर व्याख्यानमाला सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २७ ः मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ असून, मिळालेल्या मनुष्य देहाचा योग्य उपयोग केला तर जीवन अधिक सुखकर होईल. दुसऱ्याच्या सुखात सुख मानले, तर दुःखी होण्याचे कारणच राहणार नाही. त्यामुळे एकमेकांशी तुलना करणे बंद केले, तर आपले जीवन अधिक सुंदर बनेल, असे प्रतिपादन बहि:शालचे वक्ते प्रा. हेमंत टिळे यांनी केले. आगासखिंड येथील शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळच्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे विश्वस्त प्रशांत वीर अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त पूनम वीर, प्राचार्य जितेंद्र भारती, केंद्र कार्यवाह प्रा. आनंदा महाजन उपस्थित होते. प्रा. टिळे यांनी भूतलावर सर्व सुखी असा माणूस कितीही शोधला तरी तो शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही संकटे, समस्या असतातच. परंतु अशा संकटांचा सामना धीराने केला तर जीवनातील अडचणी आपण स्वतःच दूर करून जीवन अधिक सुंदर बनवू शकतो. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर निर्माण झालेला आनंद आपल्या जीवनाला अधिक सुखी बनवतो. मात्र आपल्यामुळे दुसऱ्याला झालेल्या दुःखामुळे आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. हा साधा नियम आपण अंगीकारल्यास आपण आनंदी होऊ, असेही त्यांनी सांगितले. प्रा. मालती निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले. केंद्र कार्यवाह प्रा. आनंदा महाजन यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT