नाशिक

संदर्भ ग्रंथांमध्ये ‘उजेड पेरणारी माणसं’

CD
(दोन कॉलम वापरावी) --------- एम. ए.(मराठी)च्या संदर्भ ग्रंथांत ‘उजेड पेरणारी माणसं’चा समावेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : येथील कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशाेधन केंद्रातील ‘एम. ए.’च्या मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित झाला आहे. त्यातील द्वितीय सत्रात ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी जळगावचे लेखक आनंदा लाेटन पाटील यांच्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या वैचारिक साहित्यकृतीची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. विभागप्रमुख व अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. डाॅ. म. सु. पगारे, सदस्य डाॅ. दीपक खरात, डाॅ. भारती साेनवणे, प्रा. डाॅ. युवराज मानकर, डाॅ. सुनील अवचार, प्रा. डाॅ. आशुताेष पाटील यांनी ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी लागणाऱ्या संदर्भ ग्रंथांची निवड केली आहे. त्यात आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाची संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट केला आहे. एम.ए.च्या (भाग १) द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांना निवडक वैचारिक लेखनाचा अभ्यास करण्यासाठी या साहित्यकृतीची मदत हाेईल. दरम्यान, या पुस्तकात खानदेशातील निवडक अशा ८४ अवलियांचा संक्षिप्त जीवनप्रवास मांडला आहे. कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, ग्रामसंस्कृती अशा विविध क्षेत्रात काम करणारी ही माणसं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT