Rain Update esakal
नाशिक

Rain Update: जिल्ह्यामध्ये आजपासून 5 दिवसात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज; गणेशोत्सवामध्ये वरुणराजाची हजेरी कायम

सकाळ वृत्तसेवा

Rain Update : जिल्ह्यात बुधवारपासून (ता. २७) १ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. गणेशोत्सवामध्ये वरुणराजाची हजेरी आज कायम राहिली.

शहर व परिसरात दुपारनंतर सुरु झालेला पाऊस सायंकाळपर्यंत २० मिलिमीटर इतका नोंदवला गेला. (Light to moderate rain forecast in district in 5 days from today monsoon rain presence in Ganeshotsav continues nashik)

शहर आणि परिसरात सोमवारी (ता. २५) सायंकाळी ३०.३ मिलिमीटर पाऊस झाला होता. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : मालेगाव-०.९, बागलाण-०.४, कळवण-४.८, नांदगाव-०.१, सुरगाणा-३.६, नाशिक-१०.९, चांदवड-११.३, इगतपुरी-४.२, पेठ-४.४, निफाड-०.४, येवला-०.१, त्र्यंबकेश्‍वर-०.१, देवळा-३.१. सिन्नर तालुक्यात मात्र पावसाने हजेरी लावली नाही.

दरम्यान, जायकवाडीसाठी नांदूरमधमेश्‍वर धरणातून आज सकाळपर्यंत जवळपास १३ टीएमसी पाणी रवाना झाले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहील. तापमान कमाल ३० ते ३१, किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस, वाऱ्याचा वेग तासाला ८ ते ११ किलोमीटर असा राहील.

मंडलनिहाय पाऊस

(आकडे २४ तासातील मिलीमीटरमध्ये)

० कळवण-१२.३

० नवीबेज-१४.८

० नाशिक-२२.८

० गिरणारे-१८.३

० माडसांगवी-१९.८

० ननाशी-१९.५

० इगतपुरी-१९.५

० करंजाळी-१५.३

० वडनेर-चांदवड-५५.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT