lino bags 
नाशिक

लिनो बॅग्जच्या वापराने त्यांच्यावर उपासमारीची वेळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक / लासलगाव : लासलगाव ही आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. येथून देश-विदेशात कांदा पाठविला जातो. याकरिता कांद्याचे पॅकिंग कंतान (बारदान) किंवा पीपी लिनो बॅगमधून पाठविली जाते. मात्र कंतान पिशवीचा उत्पादन खर्च जास्त असल्याने व्यापाऱ्यांकडून लिनो बॅगेला विशेष पसंती मिळत आहे.

कांदा पॅकिंगकरिता अनेक वर्षांपासून लासलगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक रोड, संगमनेर, धुळे, मंचर येथे बारदान पिशव्या बनविण्याचा व्यवसाय चालतो, कंतानचा माल कोलकता येथून येतो. त्यानंतर कटिंग व शिलाई होऊन त्याचे 100 चे बंडल करून बांधले जातात. 45, 50, 60 किलोंचे पॅकिंगचे कटिंग करून माल तयार केला जातो. त कटर व त्याचा साथीदार याला 240 रुपये गाठ, तर शिलाई महिला कामगार यांना 60 रुपये शेकडा मजुरी मिळते.

एक हजार कुटुंबांची उपजीविका 

यामुळे साधारणपणे 50 किलोंच्या एका गोणीचा कटिंग शिलाईसह खर्च 30 रुपये येतो. एकट्या लासलगावमध्ये 1000 कुटुंबे याच व्यवसायावर उपजीविका करतात. मात्र आता लिनो बॅग कमी खर्चात उपलब्ध होऊ लागल्याने बारदान गोणीचा खर्च शेतकरी व व्यापारी यांना न परवडणारा ठरत आहे. कारण लिनो बॅगेला कटिंग, शिलाई, पॅकिग हा खर्च येत नाही. लिनो बॅग 10 रुपये नगाने पडते.

कंतान पिशवी तयार होण्यास जास्त कालावधी लागतो, तर लिनो बॅग विविध पॅकिंगमध्ये तयार असल्याने ग्राहक त्यास पसंती देतो. उन्हाळ्यात मात्र कंतान पिशवीचा वापर केला जातो. त्यात माल खराब होत नाही.
सागर चोथानी संचालक, गायत्री ट्रेडर्स, लासलगाव
----
कंतान कटिंग यावर माझ्या संपूर्ण कुटुंबाची उपजीविका चालते. दिवसाला दोन ते तीन गाठी कटिंग करून आम्हाला 240 रुपयांप्रमाणे मजुरी मिळते. लिनो बॅगेचा वापर होऊ लागल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.
भिकन साठे कंतान पिशवी कटर
--------
कंतान पिशवी कटिंगनंतर आम्हाला घरी शिलाईसाठी देतात. यातून 60 रुपये शेकडा मजुरी मिळते. आठवड्याला 1000 रुपये मिळतात. त्यावर कुटुंबाचा गाडा चालतो.
हिराबाई घोलप, शिलाई महिला कामगार
-------
कंतान पिशवी साधारणपणे 30 रुपये, तर लिनो बॅग 10 रुपये पडते. त्यामुळे नक्कीच दोन्हीचा वापर करण्यापूर्वी आर्थिक बजेटचा विचार करावा लागतो.
रतन खांगळ, कांदा उत्पादक, कोलटेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT