Liquid Biopsy esakal
नाशिक

Liquid Biopsyला ‘क्रांतिकारी संशोधना’ चे मानांकन! दातार कॅन्‍सर जेनेटिक्‍सला USFDA कडून मिळाला बहुमान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मेंदूच्या दुर्गम कर्करोगाचे निदानासाठी मोलाची मदत करणाऱ्या रक्त चाचणीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनातर्फे (युएसएफडीए) ‘क्रांतिकारी संशोधनाचे’ मानांकन प्राप्त झाले आहे.

बायोप्सी करणे अशक्य असल्‍याने मेंदूच्या कर्करोगाचे निदान करताना मदत व्‍हावी, यासाठी दातार कॅन्सर जेनेटिक्सने ‘लिक्विड बायोप्सी’ विकसित केली आहे. यासंदर्भात 'दातार'तर्फे माहिती जारी केलेली आहे. (Liquid Biopsy is rated as revolutionary research Datar Cancer Genetics receives award from USFDA nashik news)

लंडन येथील इम्पिरिअल कॉलेज येथील एका संशोधन पथकाने केलेल्या प्रोस्पेक्टीव ब्लाइंडेड संशोधनात मेंदूचा घातक कर्करोग शोधण्यात या तपासणीने मोठी अचूकता दर्शविली असल्‍याचे दातार कॅन्‍सर जेनेटिक्‍स यांच्‍यातर्फे सांगण्यात आले आहे.

संस्‍थेला आतापर्यंत अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे तीन वेळा ‘क्रांतिकारी संशोधन’ (ब्रेकथ्रू डेसिग्नेशन) मानांकन दिले गेले आहे. यात मेंदूच्या कर्करोगासह स्तन आणि प्रोस्टेटचा कर्करोग शोधण्यासाठी उपलब्ध असलेल्या लिक्विड बायोप्सीचा समावेश आहे.

नुकताच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मेंदूच्या कर्करोगाच्या निदानात मदत करण्यासाठी विकसित केलेल्या ‘TriNetra-GlioTM’ या रक्तचाचणीसाठी ‘क्रांतिकारी संशोधन’ मंजूर केले आहे.

मेंदूच्‍या कर्करोगाचे असे आहे प्रमाण

मेंदूचा कर्करोग भारतातील दहावा सर्वात प्राणघातक कर्करोग असल्‍याचे कंपनीचे म्‍हणणे आहे. दरवर्षी सव्वीस हजाराहून अधिक प्रौढांचा या आजारामुळे मृत्यू होतो. मेंदूच्या कर्करोगाचे निदान जोखमीचे आणि संसाधन-केंद्रित असून सुमारे चाळीस टक्‍के प्रगत अवस्थेतील मेंदूच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मेंदूची बायोप्सी करणे केवळ अशक्य असते.

जगभरात सध्या मेंदूच्या कर्करोगाच्या निदानासाठी कोणतीही रक्त चाचणी नाही. हिस्टोपॅथॉलॉजिकल मूल्यांकनासाठी ट्यूमर टिश्यू मिळविण्यासाठी डॉक्टरांना जटिल शस्त्रक्रिया प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागते. अशात लिक्विड बायोप्सीचा उद्देश मेंदूच्या गाठीतून रक्तात सोडल्या गेलेल्या अत्यंत दुर्मिळ पेशी शोधण्याचा आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

या संशोधनात ‘क्लिनिकल प्राक्टिस’ बदलून टाकण्याची आणि मेंदूचे दुर्गम ट्यूमर असलेल्या रुग्‍णांना मदत करण्याची क्षमता आहे. भारतीय विज्ञानासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे आणि जागतिक स्तरावर कर्करोग संशोधनामधील महत्त्वाचे योगदान आहे, असे मत कर्करोगतज्‍ज्ञ डॉ. सेवंती लिमये यांनी व्‍यक्‍त केले आहे.

कंपनीच्‍या वैद्यकीय संचालक डॉ. दर्शना पाटील म्‍हणाल्‍या, की दातार कॅन्सर जेनेटिक्सला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने दिलेले ‘क्रांतिकारी संशोधन’ हे मानांकन म्हणजे चाचणीमागील तंत्रज्ञानाला मिळालेली अधिकृत मान्यता आहे.

कंपनीने विकसित केलेल्या ट्यूमर पेशी संवर्धन आणि शोध यांच्या विशेष तंत्रज्ञानामुळेच ही नॉन-इनवेसिव्ह चाचणी मेंदूच्या ट्यूमरसारख्या अत्यंत आव्हानात्मक कर्करोगाचे अचूक निदान करू शकते. या चाचणीला यापूर्वी युरोपमध्ये ‘सीई’ प्रमाणपत्रही मिळाले असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student suicide attempt: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT