NSK26H33136
नंदुरबार : संशयितांकडून जप्त केलेली रक्कम.
---
शेतकऱ्यांचे पशुधन चोरणारे दोघांना अटक
---
वाहनासह ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २० : पशुधनाची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून रोकड, दोन वाहने, असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पशूधन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पथक स्थापन केले होते. हा गुन्हा अक्कलकुव्यात राहणारे महेबूब युसूफ कुरेशी, हाशीम पिरबक्श मक्राणी यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासाठी पिकअप गाडीचा (एमएच ४८, एजी ८६५७) वापर केला होता. वाहन नंदुरबार शहरातून विसरवाडीकडे गाय व म्हशी चोरी करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. मंगळवारी (ता. २०) पथकाने नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीपुढे ठेकवद गावाजवळ सापळा रचला. ते वाहन थांबवून पथकाने चौकशी केली. वाहनात महेबूब युसूफ कुरेशी (वय २५), हाशिम पिरबक्श मक्राणी (३१, दोन्ही रा. मक्राणी फळी, अक्कलकुवा) बसले होते. वाहनामागील बाजूस एक दुचाकी मिळून आली. दुचाकीचा वापर शेतात बांधलेल्या गुरांची पाहणी करण्यासाठी केला जात होता.
मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी संशयितांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने शहादा तालुक्यात दुचाकी (एमएच ३९, एटी ३६७३) पाहणी करून सहा ते सात ठिकाणी गाय, म्हैस, लहान वासरू यांची चोरी केली होती. पशूधन दोन वाहनांनी (एमएच ४८, एजी ८६५७) आणि (एमएच १८, डीजी १४९१) घेऊन जात होते. वाहन शहादा पोलिस ठाण्यात जमा असल्याची माहिती संशयितांनी दिली.
संशयितांनी चोरी केलेले पशूधन गावी जाऊन विकून मिळालेले पैसे आपसात वाटून घेतले होते. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक लाख ५ हजार रुपयांची रोकड, सहा लाख रुपयांचे वाहन, १ लाखाची दुचाकी, १५ हजारांचा मोबाईल, असा एकूण आठ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहादा, सारंगखेडा व म्हसावद पोलिस ठाण्यातील सात पशुधन चोरीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक महेश निकम व विकास गुंजाळ, हवालदार दत्तात्रय बागल, स्वप्नील गोसावी, मोहन ढमढेरे, पोलिस नाईक चेतन साळवे, अंमलदार शोएब शेख, भरत उगले, मनोज महाजन, राहुल पांढारकर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.