आदिवासी गाव-पाड्यांत
पशुधन चोरट्य़ांचा धुमाकूळ
पंधरा दिवसांत दोन चोरी; तीन जनावरे लंपास
सकाळ वृत्तसेवा
वकवाड, ता. १६ : चोंदीपाडा आणि खारीखान (ता. शिरपूर) येथे सोमवारी (ता. १६) मध्यरात्री चोरट्य़ांनी तीन ठिकाणी डल्ला मारून तीन जनावरे चोरून नेली. यामुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोंदीपाडा येथे बहादूर गुगल्या पावरा यांच्या घराजवळील गोठ्यात बांधलेली ४० हजार रुपये किमतीची दुधाळ गाय, तर कांतीलाल वांगऱ्या पावरा यांच्या गोठ्यातील दहा हजार रुपये किमतीचे म्हशीचे पारडू चोरट्य़ांनी लंपास केले. त्यानंतर खारीखान येथील बापूसाहेब आमलाल पावरा यांच्या गोठ्यात बांधलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची म्हैस चोरून नेली. या तीनही घटनांमध्ये सुमारे एक लाख रुपयांचे पशुधन चोरीस गेले असून, याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी चोंदीपाडा येथील गावपाटील वालीराम देवसिंग पावरा यांच्या दोन शेळ्याही चोरीस गेल्या होत्या. त्यामुळे आदिवासी गाव-पाड्यांमध्ये पशुधन चोरट्य़ांचा वावर वाढल्याची चर्चा आहे. पंधरा दिवसांत चोरीची दुसरी घटना घडल्याने पशुपालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पोलिसांनी आदिवासी गाव-पाड्यांमध्ये रात्रीची गस्त वाढवून पशुधन चोरट्य़ांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व पशुपालकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.