akshay tritiya esakal
नाशिक

अक्षयतृतीयेवर लॉकडाउन अन् मंदीचे सावट; विक्री अर्ध्यावर

विशाल मराठे

मेशी (जि.नाशिक) : कसमादेसह खानदेशात उत्साहात (akshay tritiya festival) साजऱ्या होणाऱ्या आखाजी अर्थात, अक्षयतृतीयेला पूजेसाठी लागणाऱ्या घागरींना या वर्षी मंदीचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे यंदा घागरींची विक्री अर्ध्यावर आली आहे. (lockdown affect festival sale nashik marathi news)

विक्री अर्ध्यावर

शेतकऱ्यांचा नवीन हंगाम सुरू करण्याचा मुहूर्त म्हणजे अक्षयतृतीया. अक्षयतृतीयेला ग्रामीण भागात सांस्कृतिक व वैज्ञानिक अधिष्ठान असल्याने आजच्या युगात या सणाचे महत्त्व आहे. पाण्याची घागर भरून पाण्यात वाळा टाकून सुगंधित पाणी पिण्याची परंपरा आहे. कसमादे परिसरात नव्या घागरींची विक्री मोठ्या प्रमाणात होते. कळवण, बागलाण, देवळा, मालेगाव तालुक्यांत घागरी बनविण्याच्या व्यवसायातून एक कोटीपर्यंत उलाढाल होते. या वर्षी मात्र या व्यवसायात मोठी घट झाली. घागरींची विक्री अर्ध्यावर आली आहे. कोरोनाची तीव्रता, संचारबंदी, आठवडेबाजार बंद, अलीकडच्या काळात कोरोनाने अनेक कुटुंबातील कर्ते, सदस्य गमावल्याने यंदा अक्षयतृतीयेवर सावट आले आहे. यामुळे कुंभारकाम करणाऱ्या वर्गाची यंदा आर्थिक उलाढाल मंदावली आहे. कसमादे परिसरातील अनेक कुटुंबाचा हा व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन असल्याने व्यवसायातील मंदी जीवनशैलीवर परिणाम करणारी ठरत आहे. फ्रिजच्या जमान्यात अक्षयतृतीयेच्या या घागरपूजनाच्या परंपरेमुळे घागरीतील गार पाण्याचा गारवा टिकून आहे. मातीच्या इकोफ्रेंडली घागरी पाणी शुद्धतेसाठीही वापरल्या जातात. ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिक अजूनही घागरीतील पाण्याला पसंती देतात. त्यामुळे अक्षयतृतीयेची घागर पूजनाची परंपरा सांस्कृतिक व शेती विज्ञानची सांगड घालणारी आहे. त्यामुळे ग्रामीण शेतकरी जीवनात या सणाला महत्त्व आहे.

घागरी बनविण्याची ठिकाणे

देवळा तालुका- देवळा, रामेश्वर, खर्डा, मेशी, वाखारी

बागलाण तालुका- जायखेडा, ब्राह्मणगाव, डांगसौंदाणे

मालेगाव तालुका- पाटणे, मालेगाव, झोडगे

कळवण तालुका- कळवण, कानाशी, अभोणा, ओतूर

सलग दोन वर्षे आमचा व्यवसाय मंदीत असल्याने घागरींची विक्री अर्ध्यावर आली आहे. तरीही आमचा व्यवसाय पुन्हा भरारी घेईल, अशी आशा आहे.

- प्रवीण चव्हाण, कुंभार व्यावसायिक, मेशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT