nashik esakal
नाशिक

आजपासून नाशिक शहर-जिल्ह्यात लॉकडाउन निर्बंध शिथिल

विनोद बेदरकर

नाशिक : शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहर-जिल्ह्याचा (nashik lockdown) समावेश वर्ग तीनमध्ये होत असल्याचे स्पष्ट झाल्याने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख, जिल्हाधिकारी सूरज मांढरे (collector suraj mandhare) यांनी जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. (Lockdown-restrictions-released-in-Nashik-city-district-from-today-marathi-news)

पूर्ववत कामकाजामुळे नागरिकांत उत्साह, वीकेंडमध्ये विवाहांना प्रतिबंध

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्य शासनाने कोरोना संसर्ग दर पाच टक्केच्या आत असलेल्या भागातील निर्बंध शिथिल केले आहेत. तर कोरोना संसर्गाचा दर आणि त्या भागातील ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या याचा ताळमेळ घालून पाच टप्प्यांत शहराची वर्गवारी निश्चित केली आहे. राज्य शासनाने ३ जूनपर्यंतच्या सप्ताहाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्येचा विचार करून ही नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार दुपारी चारपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत जमावबंदी, तर सायंकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदीचे नियम कायम राहणार आहेत.

- अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू

- शनिवार-रविवार नेहमीप्रमाणे वीकेंड लॉकडाउन

- इतर सर्व प्रकराची दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू

- मॉल्स, थिएटर, नाट्यगृह बंद राहातील

- उपहार गृह ५० टक्के क्षमतेने चारपर्यंत खुले

- दुपारी चार ते रात्री आठपर्यंत पार्सल सेवा सुरू

- वीकेंड लॉकडाउन काळात पार्सलसेवा सुरू

- क्रीडांगण, मैदान, वॉकिंग पहाटे पाच ते सकाळी नऊ

- खासगी कार्यालय दुपारी चारपर्यंतच सुरू

- शासकीय, खासगी कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती

- खेळांसाठी पहाटे पाच ते सकाळी नऊ हीच वेळ

- ५० टक्के उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम

- अंत्यविधीसाठी, दशक्रियेला २० जणांचीच उपस्थिती

- स्थानिक स्वरांज्य संस्था बैठका ५० टक्के उपस्थिती

- बांधकाम साइटवर दुपारी चारपर्यंत कामकाज सुरू

- कृषीविषयक दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील

- ई-कॉमर्स कामकाज नियमितपणे सुरू ठेवता येईल

- पहाटे पाच ते सायंकाळी पाचपर्यंत जमावबंदी

- सायंकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी राहील

- जिम, व्यायामशाळा, सलून, पार्लर चारपर्यंत ५० टक्के उपस्थिती

- सार्वजनिक बस वाहतुकीत उभे राहून प्रवास नाही

- नियमित मालवाहतुकीतीला परवानगी राहील

- आंतर-जिल्हा प्रवासाला ई-पास परवानगी नाही

- वर्ग ५ गटांसाठी मात्र ई-पास परवानगी लागेल

- कारखान्यातील उत्पादनप्रक्रिया पूर्णपणे सुरू

पॉझिटिव्हिटी रेट घटला

राज्य शासनाच्या नियमानुसार नाशिक महापालिका क्षेत्रात ३ जूनला महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा संसर्गदर (पॉझिटिव्हिटी रेट) ३.८, तर महापालिका क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागाचा दर ८.३ असल्याचे पुढे आले. महापालिका क्षेत्रात दोन हजार ७७० ऑक्सिजन बेडपैकी ६१८ (२२.३१ टक्के) रुग्ण उपचार घेत आहे. तर ग्रामीण भागात दोन हजार ४८६ ऑक्सिजन बेडपैकी ३७९ (१५.२५ टक्के) रुग्ण उपचार घेत आहे. तर महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन आणि बिटको रुग्णालयात ४० टक्क्यांवर रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT