vishwas-nangre-patil-nashik 123.jpg 
नाशिक

लॉकडाऊन शिथिल होताच पोलीसांसमोर आणखी 'एक' डोकेदुखी!..मोठे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पावणे दोन महिन्यांपासून शहरात लॉकडाऊन होते. या काळात शहरातील गुन्हेगारीमध्ये मोठी घट झाली होती. मात्र गेल्या काही दिवसात या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घरफोड्यांपासून ते गोळीबारापर्यंतच्या घटना या दोन दिवसात घडल्याने पोलिसांसमोर कोरोना पाठोपाठ आता गुन्हेगारांचे आव्हान उभे राहिले आहे. 

शहरात वर्दळ वाढू लागली..नाकाबंदी ठिकाणीही पोलिसांची अनुपस्थिती
 
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू लागल्यामुळे गेल्या 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या या काळात शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट नाकाबंदी करीत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले गेले. शहरभर पोलिसांचा कडेकोट पहारा होता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांमध्ये किरकोळ स्वरुपाचे गुन्हे वगळता मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये घट आली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. यातही टप्प्या-टप्प्याने वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या बहुतांशी व्यापारी-व्यावसायिकांची दुकाने सुरू झाली आहेत. रस्त्यावर रहदारी वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या सुरू झाल्या आहेत. बाजारपेठांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. परिणामी शहरात वर्दळ वाढू लागली असून नाकाबंदीच्या ठिकाणीही पोलिसांची उपस्थिती आता राहत नाही. मात्र त्याचा परिणाम गुन्हेगारी वाढ होण्यात झाल्याचे दिसून आले आहे.

गुन्हेगारीत वाढ...पोलिसांसमोर मोठे आव्हान 

गेल्या दोन दिवसांमध्ये घरफोडी करताना मुंबई नाका पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले आहे. तसेच देवळाली कॅम्प परिसरात तडीपार गुंडांने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. तर, सिडको, उपनगर, पंचवटी, भद्रकाली या परिसरात हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. उपनगरमध्ये दोन घटनांमध्ये टोळक्‍याने मारहाण केल्याने दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तसेच दुचाक्‍या चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. या वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. दीड-पावणे दोन महिन्यांपासून कोरोनाविरोधातील बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

लॉकडाऊन शिथिल होताच आणखी 'एक' डोकेदुखी वाढली...पोलिसांसमोर मोठे आव्हान

पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT