Logician Captain Ashok Kumar Kharat News
Logician Captain Ashok Kumar Kharat News esakal
नाशिक

Nashik News : मुख्यमंत्री अचानक आल्याने वेगळा अर्थ काढला गेला!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : मुख्यमंत्री याआधी एकदा येऊन गेले आहेत, शिवाय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दीपक केसरकर यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे मंत्री, नेते कार्यकर्ते अनेक वेळेस मी बांधलेल्या सिन्नरच्या मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात. याची चर्चा कधी झाली नाही.

मात्र, मुख्यमंत्री येऊन गेल्याची मात्र चर्चा करत विपर्यास कऱण्यात आला अशी खंत तर्कशास्त्रतज्ञ कॅप्टन अशोककुमार खरात यांनी ‘सकाळ’ कडे बोलून दाखवली आहे. (Logician Captain Ashok Kumar Kharat Statement About CM Visit To his Constructed Temple Chief Minister came and went but it distorted Nashik News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी भेटी दरम्यान मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात सपत्नीक अभिषेक केला. त्यांच्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यासह शासकीय यंत्रणा होती.

मुख्यमंत्री शिंदे अभिषेक आणि दर्शनासाठी आले होते. त्यांनी अचानक सांगितल्याने आम्ही ऐन वेळेला शिवनिका संस्थानचे सर्व विश्वस्त या नात्याने पोचलो. कोणत्याही राजकीय आणि वैयक्तिक विषयावर चर्चा झाली नाही, असे कॅप्टन अशोककुमार खरात यांनी सांगितले. मुख्यमंत्री अचानक आले म्हणून या गोष्टीचा वेगळा अर्थ काढला गेला, असेही खरात म्हणाले.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

"सर्वच पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी आमच्या शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिरात येतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिर बांधायला किती दिवस लागले, दगड कुठून आणला, किती दिवसात मंदिर पूर्ण बांधून झाले, याबाबत चर्चा झाली. शिवाय त्यांना त्यांच्या गावाकडे याच पद्धतीचे मंदिर बांधायचे असल्याने त्यांनी मार्गदर्शन करा अशी विनंती केली. यासंबंधी आम्हाला अचानक कळवण्यात आले होते एवढेच."

- कॅप्टन अशोककुमार खरात, तर्कशास्त्रतज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांची बीडमधील ८ जून रोजीची सभा रद्द; काय आहे कारण?

Mumbai Police: मुंबईत स्पेशल 26! पोलीस असल्याचा बनाव करत कॅफे मालकाच्या घरात घुसले अन् 25 लाख लुटले

Kangana Ranaut: कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, टीम म्हणाली, "आमची क्वीन सध्या देशाप्रती..."

Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

SCROLL FOR NEXT