नाशिक

मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू

CD
मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू --- खुनाचा गुन्हा दाखल; लोणजे गावात तणावपूर्ण शांतता सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ५ ः लोणजे (ता. चाळीसगाव) गावात पाच दिवसांपूर्वी सुमारे १३ जणांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा सोमवारी (ता. ५) दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद गावात उमटले. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त गावात तैनात केला आहे. या प्रकरणी पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात सर्व संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ सप्टेंबरला लोणजे गावात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचे पती मिलन दिलीप सोनवणे यांना काही जणांनी मारहाण केली. बुधवारी (ता. ३०) सकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरामागील शक्ती कैलास गायकवाड, राहुल अशोक वाघ, ऋतिक धनराज सोनवणे, शिवाजी जितेंद्र सोनवणे, बादल अशोक वाघ, संदीप धर्मराज सोनवणे, गणेश ऊर्फ गट्या भाऊसाहेब सोनवणे, विशाल धर्मा सोनवणे, विनोद रोहिदास सोनवणे, मोहन हेमराज सोनवणे, संतोष कैलास गायकवाड, सागर प्रेमराज सोनवणे व बंटी सुहास सोनवणे यांनी शिवीगाळ केली व घरावर अचानक दगडफेक केली. महिलेचे पती मिलन सोनवणे यांच्यासह त्यांचे सासू- सासरे व दीर घराबाहेर येताच त्यांना मारहाण केली. भांडण आवरण्यासाठी आलेल्या महिलेच्या चुलत सासरे व दीरांनाही मारहाण केली. तिघे घरात घुसले. त्यातील बादल अशोक वाघ याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने मिलन सोनवणे यांना मारहाण केली. गणेश सोनवणे व संदीप सोनवणे यांनीही लाकडी दांडा व लोखंडी रॉडने मिलन यांना मारहाण केली. यात मिलन यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना तत्काळ चाळीसगावला खासगी दवाखान्यात दाखल केले. मृत्यूमुळे तणाव दरम्यान, दवाखान्यात उपचार सुरू असताना जखमी मिलन सोनवणे यांचा सोमवारी (ता. ५) मृत्यू झाला. हे गावात कळताच मोठा जमाव जमा झाला. दोन्हीकडील काही समाजाचे पदाधिकारी गावात आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गावात तगडा बंदोबस्त तैनात केला. पोलिस बंदोबस्तात मृत मिलन सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT