nashik jail esakal
नाशिक

Positive News : नाशिक कारागृहात कैदी साकारताहेत गणेशमूर्ती!

अंबादास शिंदे

नाशिक रोड : मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे. येथे सुमारे साडेपाचशे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात असून, मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात बंदिवान व्यस्त आहेत. या कामामुळे गणेशोत्सवाचा वेगळाच अनुभव बंदिवान आणि अधिकाऱ्यांना येत आहे. (lord-Ganesh-idols-making-Prisoner-nashik-jail-marathi-news-jpd93)

कारागृहात बंदिवान साकारताहेत गणेशमूर्ती

हा अनुभव अधिकाऱ्यांच्या मनाला समाधान देणारा, तर काही बंदिवानांना चांगले करून दाखविण्याची जिद्द देणारा आहे. शासनानेही घरगुती मूर्ती घडवाव्यात यावर भर दिला. उंचीवर बंधने आणली. मूर्तीसोबत पाट व वस्त्र मोफत देण्यात येते. गणेशभक्तांनी घरीच मूर्ती विसर्जन करावे यासाठी प्रबोधन केले जाते. नाशिक रोड कारागृहात कारागृह प्रशासनातर्फे काही वेगवेगळ्या प्रकारची कामे करून घेतली जातात. कारागीर व कलाकार बंदिवान त्यांच्या इच्छेनुसार काम दिले जाते. नाशिक रोड कारागृहात सध्या सुतार, शिवण, लोहार, चर्मकला, विणकाम, बेकरी, रसायन विभाग, मूर्तिकला, धोबी विभाग असे नऊ कारखाने आहेत. कारखान्यात बनविलेल्या वस्तू या कारागृहाच्या प्रवेशद्वारावर केंद्रांमधून विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामधून कारागृहाला उत्पन्नदेखील मिळते. पहिल्या वर्षी १३८ मूर्तींची विक्री करून एक लाख २२ हजार उत्पन्न मिळविले होते. दुसऱ्या वर्षी एक हजार १३४ मूर्तींची विक्री करून सुमारे १३ लाख, तिसऱ्या वर्षी ६६८ मूर्ती करून ११ लाख ३६ हजार मिळविले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे ४८६ मूर्ती विक्री करून ११ लाख ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. कारागृहातील कैदी फुलाराम नवराम मेघवाल, अशोक गंगाराम घरट, विकास विठ्ठल घुरूप, महेंद्र मिद, मिल तेरवा, बापू लक्ष्मण साळुखे, वजीर नानासिंग बादेला, रोहिदास सरभीर रघुटारे, शंकर मदनहारे हे कैदी चार महिन्यांपासून गणरायाच्या मूर्ती साकारत आहेत. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती विभागाचे व्यवस्थापक एस. ए. गिते, प्रशांत पाटील, अभिजित कोळी, भगवान महाले गेल्या चार महिन्यांपासून शाडू, पर्यावरणपूरक रंग व इतर साहित्य देऊन बंदिवानांकडून मूर्ती बनवून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT