missing Nitin Kokane
missing Nitin Kokane esakal
नाशिक

प्रेमविवाह झालेला तरुण बेपत्ता; मुलीकडच्यांनी घातपात केल्याचा संशय

विजय पगार

वाडीवऱ्हे/इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीतील (MIDC) कंपनीत काम करणारा तरुण आठवड्यापासून बेपत्ता (Disappeared) झाला आहे. नितीन मधुकर कोकणे असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. (love marriaged man has been missing from Gonde from week Nashik News)

दरम्यान, कामाच्या परिसरात त्याची दुचाकी आढळली. मात्र, तरुणाचा तपास लागलेला नाही. काही महिन्यांपूर्वी नितीनचा प्रेमविवाह झाला आहे. मुलीच्या नातेवाइकांनी अपहरण करून अथवा सुपारी देऊन त्याचा घातपात केल्याचा संशय नितीनच्या नातेवाइकांना आहे. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी काहीही प्रगती होत नसल्याने हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, संबंधितांना जेरबंद करावे, तरुणाचा शोध घ्यावा, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. साहेबराव शंकर कोकणे (रा. पारदेवी, ता. इगतपुरी) यांनी निवेदन दिले.

पारदेवी येथील नितीन कोकणे नेहमीप्रमाणे गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीत कामाला गेला. तो घरी न परतल्याने रात्री संपर्क झाला नाही. नातेवाइकांकडे चौकशी करूनही तपास न लागल्याने नातेवाइकांनी २४ मेस वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात नितीन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. बेपत्ता नितीनने भावली येथील मुलीशी फेब्रुवारी महिन्यात प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहाला मुलीचे वडील, मामा आदींचा विरोध होता. याच काळात संबंधितानी नितीनला ठार करण्याची धमकी दिल्याने २९ मार्चला इगतपुरी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. एप्रिल महिन्यात त्याच्या पत्नीकडून आलेल्या नोटिशीला नितीनने उत्तरही दिले होते. नितीनचे अपहरण करून घातपात झाल्याचा संशय निवेदनात व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT