Lumpy Virus News esakal
नाशिक

Nashik Lumpy Update: ‘लम्पी’ने येवल्यातील शेतकऱ्याची वाढविली चिंता; तालुक्यात 8 जनावरे बाधित

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : राजापूर (ता. येवला) येथे लम्पी आजाराने बैल दगावला असून यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली आहे. लम्पीमुळे बैल मयत होण्याच्या घटनेने तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यात आठ जनावरे या आजाराच्या विळख्यात सापडले आहे. (Lumpy raises concern of farmers in Yeola 8 animals affected in taluka Nashik Lumpy Update news)

राजापूर येथील संजय काळू जाधव या शेतकऱ्याचा बैल लम्पी आजाराने दगावला. गाव मोठे असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून यापूर्वीच गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. असे असताना देखील बैल लम्पीचा शिकार झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.चिते यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

येवला तालुक्यात एकूण नोंदणीकृत ८४ हजार पशुधन असून ३५ पथकामार्फत या सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र दुर्दैवाने ८ जनावरे लम्पी आजाराने बाधित झाली असून त्यांच्यावर यशस्वी उपचार सुरू आहेत. उर्वरित राहिलेल्या जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चित्ते यांनी दिली.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या जनावरांमध्ये लम्पी सदृश काही लक्षणे दिसल्यास त्वरित खासगी पशुवैद्यकीय अथवा शासकीय पशुवैद्यकीय संपर्क साधावा असे आवाहन तालुका पशुधन पर्यवेक्षक डॉ.सतीश कुर्हे यांनी केले आहे.

अधिकाऱ्याकडे २२ गावांचा कारभार

राजापूर येथे जनावरांची संख्या जास्त असून एक दवाखाना व एक पशुवैद्यकीय अधिकारी असून त्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अनकाई सह २२ गावांचा कारभार आहे. राजापूर येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना इकडे जावा की तिकडे जावा असा प्रश्न पडतो आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सरपंच वंदना सानप, दत्ता सानप, सुभाष वाघ, उपसरपंच प्रकाश वाघ, सदस्य ज्ञानेश्वर दराडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT