नाशिक

नंदुरबार जलप्रकल्पाची दखल

CD
31930 नवी दिल्ली : मान्यवरांच्या हस्ते ''सीआयआय नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन वॉटर मॅनेजमेंट २०२६'' पुरस्कार स्वीकारताना लूपिन फाउंडेशनचे योगेश राऊत, नीलेश पवार. -- ‘लूपिन''ला राष्ट्रीय जलव्यवस्थापन पुरस्कार अक्कलकुव्यातील आदिवासी २५ गावांच्या जलप्रकल्पाची दखल - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १० : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील २५ आदिवासी गावांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘समूह विहीर सिंचन प्रणालीद्वारे आदिवासी कुटुंबांचा उपजीविका विकास’ या अभिनव प्रकल्पाला प्रतिष्ठित ‘सीआयआय नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन वॉटर मॅनेजमेंट - २०२६’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ॲटलस कॉप्को इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या आर्थिक सहकार्याने लूपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि सीआयआय-त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे आयोजित १२ व्या ''वॉटर इनोव्हेशन समिट २०२६'' मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत ''बियॉण्ड द फेन्स'' या श्रेणीत या प्रकल्पाने विजेतेपद पटकावले. लूपिन फाउंडेशनतर्फे ‘सीएसआर'' उपमहाव्यवस्थापक योगेश राऊत आणि ‘उपजीविका‘ जिल्हा व्यवस्थापक नीलेश पवार यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. - सामूहिक व्यवस्थापन प्रयोग आदिवासी व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना शाश्वत सिंचन सुविधा मिळावी, या उद्देशाने पाच ते सहा शेतकरी कुटुंबांचा गट तयार करण्यात आला. या माध्यमातून सामूहिक विहीर, पंप संच आणि पाणी वितरण व्यवस्था उभारण्यात आली. या नावीन्यपूर्ण मॉडेलमुळे परिसरातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले असून शेतीची उत्पादकता वाढली आहे. - १४-१ प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्य़े पंचवीस आदिवासी गावांतील प्रकल्पांतर्गत १०० समूह विहिरींची निर्मिती करण्यात आली. तसेच ५०० आदिवासी शेतकरी कुटुंबांना थेट सिंचनाचा लाभ मिळाला. सुमारे एक हजार एकर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आली. वर्षभर शेतीची सोय झाल्याने हंगामी स्थलांतर घटले असून उत्पन्नात वाढ झाली आहे. या अनुषंगाने प्राप्त हा पुरस्कार म्हणजे आदिवासी शेतकरी, ग्रामस्तरीय संस्था, प्रकल्प कर्मचारी, ॲटलस कॉप्को इंडिया व सर्व भागीदारांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असून नंदुरबारमध्ये विकसित झालेले हे जल व्यवस्थापन मॉडेल देशातील इतर आदिवासी व ग्रामीण भागांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास लूपिन फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात एक नोव्हेंबर रोजी एकता दौड; ४० हजार नागरिक होणार सहभागी

दाढी-कटींग ते नख कापण्यापर्यंत...! नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जाणून घ्या...

Marathi News Live Updates : मुंबईत ताब्यात घेतलेल्या ६०० आंदोलकांची सुटका

FDA Crime : गार्डन वडापाव, रामकृष्‍ण मिल्‍ससह आठ ठिकाणांच्या खाद्यतेलावर कारवाई; पुणे जिल्ह्यात ३४ हजार ४८१ किलो तेल ताब्यात

Jintur News : दुष्काळामुळे पीक जळून गेल्याने आर्थिक विवंचनेत युवा शेतकऱ्याने संपविले जीवन; जिंतूर तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT