नाशिक

हाऊसबोट्स, क्रुझेसमुळे लाभली नवी उंची

CD
फोटो -NSK26H33871 दत्ता भालेराव - NSK26H33872 हाऊसबोट्स, क्रुझेसमुळे लाभली नवी उंची ----------------------------------- जल पर्यटन: अद्भुत सागरी प्रवास व्यस्त जीवनशैलीतून विरंगुळा मिळवण्यासाठी आणि जग जवळून अनुभवण्यासाठी पर्यटन हा मानवाचा कायमच आवडता विषय राहिला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची कल्पना रुजल्यापासून सागरी आणि जल पर्यटनाला जगभरात मोठी पसंती मिळाली आहे. पूर्वी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरणे किंवा साध्या बोटीतून फिरण्यापुरते मर्यादित असलेले हे क्षेत्र आज आधुनिक हाऊसबोट्स आणि लक्झरी क्रुझेसमुळे एका नव्या उंचीवर पोहोचले आहे. - दत्ता भालेराव, नाशिक जल पर्यटनाची सुरुवात वेगवेगळ्या गरजांमधून झाली. ब्रिटिशांनी काश्मीरमधील दल सरोवरात राहण्यासाठी स्थानिक लाकडापासून हाऊसबोट्स बनवल्या, ज्या आज तिथल्या पर्यटनाचा कणा आहेत. केरळमधील पारंपरिक केटूवल्लम हाऊसबोट्सही अशीच एक अनोखी ओळख ठरल्या. जगातील पहिल्या शाही क्रूझची सुरुवात १८३३ मध्ये इटलीच्या राजाने ''फ्रान्सिस्को'' या जहाजाद्वारे केली. जी केवळ राजघराण्यातील लोकांसाठी होती. मात्र, १८४४ मध्ये इंग्लंडच्या ''पी ॲण्ड ओ'' कंपनीने सर्वसामान्यांसाठी क्रूझ सफारी सुरू करून खऱ्या अर्थाने सागरी पर्यटनाचा पाया रचला. पुढे १९०० मध्ये हॅम्बर्ग-अमेरिका कंपनीने केवळ प्रवाशांच्या मनोरंजनासाठी डिझाईन केलेले पहिले हॉटेलसदृश जहाज ''प्रिन्स व्हिक्टोरिया'' पाण्यात उतरवले. १९१२ मधील टायटॅनिकच्या दुर्घटनेनंतर सुरक्षिततेचे नियम कडक झाले. पुढे विमानांचा सुळसुळाट झाल्यावर सागरी प्रवासात मंदी आली; परंतु १९६० च्या दशकात "जहारे हेच डेस्टिनेशन आहे" ही नवी संकल्पना आल्यावर क्रूझ उद्योगाने पुन्हा अभूतपूर्व भरारी घेतली. भारतात क्रूझ पर्यटनाचा उदय भारतात २०१९ मध्ये ''जलेश क्रूझेस''ने स्वदेशी जल पर्यटनाची यशस्वी सुरुवात केली. त्यानंतर २०२१ पासून ''कॉर्डेलिया'' कंपनीने भारतीय पर्यटकांच्या आवडीनिवडीनुसार (जसे की शाकाहारी/जैन जेवण, बॉलिवूड शो, गरबा, कॅसिनो) उत्कृष्ट सुविधा देत या क्षेत्रात क्रांती घडवली. भारत सरकारने मुंबईत ५०० कोटी रुपयांचे आधुनिक ''आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल'' उभारले असून, आता नॉर्वेजियन स्काय आणि सनसारख्या महाकाय परदेशी लक्झरी बोटीही भारतीय जलात दाखल होत आहेत. प्रमुख आकर्षणे आणि भविष्यातील संधी वाराणसी ते दिब्रुगड चालणारी जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ''गंगा विलास'', सुंदरबनची खाडी सफारी, नॉर्वेचे फियोर्ड्स, व्हिएतनामचा हॅलोंग बे आणि अंटार्क्टिका क्रूझ यांसारख्या पर्यायांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. प्रवासाची दगदग नसणे, फिरते लक्झरी हॉटेल, इनडोअर गेम्स आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य ही क्रूझ सफारीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आता हे क्षेत्र ‘मोठी जहाजे’ या संकल्पनेकडून वेगळा अनुभव देण्याकडे वाटचाल करीत आहे. सन २०३० पर्यंत प्रदूषणमुक्त एलएनजी ग्रीन क्रूझ, आशिया आणि भारताचे वाढते महत्त्व, तसेच थीम आधारित (म्युझिक, योगा, फूड) क्रूझ यांमुळे जल पर्यटनाचे भविष्य अत्यंत तेजीत असणार आहे. जमिनीवरील पर्यटनासोबतच पाण्यावरचा हा प्रवास आज सर्वाधिक आरामदायी आणि पर्यटकांचा आवडता पर्याय बनला आहे. (लेखक वरिष्ठ पर्यटन व्यावसायिक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Meenakshi Shinde Resign: ठाण्यात मोठी घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

'ए' गरम पाणी पीत जा!’ भर मैदानात वैभव सूर्यवंशीला मिळाला खास सल्ला, VIDEO व्हायरल

Spain Train Crash: 'Minister Of Death' म्हणत उडाला संतापाचा भडका! ६८ बळींनंतर स्पेनमध्ये राजीनाम्यासाठी आंदोलन

Smile Day 2026: चेहऱ्यावर हसू, पण मनात दुःख? आनंदी दिसणं आणि खरोखर आनंदी असणं यात नेमका फरक काय?

SCROLL FOR NEXT