CSG26B03070
चाळीसगाव : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘माणुसकीची भींत’ उपक्रमाचे उद् घाटन करताना चेअरमन सुरेश स्वार, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. अजय काटे आदी.
--------
गरजूंसाठी ‘माणुसकीची भींत’ला प्रतिसाद द्या
--
प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर : चाळीसगाव महाविद्यालयात उपक्रमाचे उद् घाटन
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. ३१ : दर वर्षाप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्ताने गरजू व्यक्तींना साहित्य मोफत मिळावे, यासाठी ‘माणुसकीची भींत’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा दुष्काळामुळे गरजूंपर्यंत साहित्य पोहोचावे व गरजवंतांनी याचा लाभ घ्यावा. त्यासाठी ज्यांच्याकडे अतिरिक्त साहित्य असेल, त्यांनी येथे जमा करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी केले.
येथील बी.पी. कला, एस.एम.ए. विज्ञान, के.के.सी. वाणिज्य व के.आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालयात आय.क्यू.ए.सी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माणुसकीची भींत’ या उपक्रमाचे उद् घाटन सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी प्राचार्य बिल्दीकर बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य डॉ. पंकज नन्नवरे, एन.सी.सी.प्रमुख डॉ. राजेश चंदनशिव, डॉ. वैशाली पाटील, प्रा. पंकज वाघमारे, डॉ. समाधान जगताप, प्रा. आर. एस. पाटील, हिंमत अंदोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक उपप्राचार्या डॉ. पुनम निकम यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक पाटील यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.