Madhukar Pichad Brainstroke Esakal
नाशिक

Madhukar Pichad: माजी मंत्री मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोक; नाशिकमध्ये उपचार सुरू

Vaibhav Pichad: भाजपचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज सकाळी ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती.

आशुतोष मसगौंडे

भाजपचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज सकाळी ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. आज पहाटे राजूर येथील राहत्या घरी असताना पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आल्यानंतर नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील उपचारानंतर आता त्यांची यांची प्रकृती स्थीर आहे.

मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि 1980 ते 2009 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून काम केले आहे. ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते शरद पवार यांच्या जवळच्या लोकांपैकी एक होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सदस्य होते. यासह त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच उमेदवाराकडून वैभव पिचड यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT